एकंदरीतच सुबक रंग भरणं हे पेशन्सचं काम आहे.. मग रांगोळीत असो की आयुष्यात.. रांगोळीत जमले म्हणुन आयुष्यात जमतीलच असं नाही आणि उलट अर्थीही खरं.. असो!
दिवाळी संपली पण रांगोळीची हौस काही संपेना.. smile emoticon
Sunday, October 19, 2014
मला शिकव, मी करतो म्हणत हळूहळू सगळं करत लेकाने आज स्वत:च पणत्या लावल्या.दिवाळी छानपैकी समजून घेऊन साजरी करणं चालू आहे. कोणत्या मजल्यावर कुणाकडून कसले वास येतायत तेही सध्या येऊन येऊन सांगतोय. तुपात भाजलेल्या खमंग बेसनाचा वास मात्र त्याला जामच अस्वस्थ करतो, साखर मिसळेपर्यंतही दम निघत नाही अजून.. smile emoticonबिनसाखरेचं बेसन चवीनं मिटक्या मारत खाणारा हा मी पाहिलेला पहिलाच! हा अळणी नैवेद्य घरातल्या हसत्याखेळत्या देवाच्या कायमच्या आवडीचा, मागून मागून घेतलेला, हे मनसोक्त झालं की मगच देव्हा-यातले देव आनंदाने गोड लाडवावर ताव मारतात