या सुखांनो या! :-)
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Tuesday, August 29, 2017
Monday, August 28, 2017
आजवर कधीच न केलेलं एखादं धाडस वुईथ ऑल ड्यू प्लसेस अँड मायनसेस पहिल्यांदाच संपूर्णपणे एकट्यानं करण्याची गंमत निराळीच. आपण स्वत:च स्वत:ची केवढी मदत करू शकत असतो, याचा अशावेळी आनंदी शोध लागत जातो.
गणपती, मी, पेस्ट्रीज आणि मफीन्स!
प्रोत्साहन देणा-या, पाठीशी असणा-या सुहृदांना मनापासून धन्यवाद. टॅगींग आवडत नाही, म्हणून इतकंच :-)
#simplydelicious
Friends, i only sold it, but it was an exercise and a mixed bunch of experiences! Something totally new for me. Hence shared!
Friday, August 25, 2017
Saturday, August 19, 2017
कम्युन!
इथे त-हेत-हेच्या विषयांवर इरेसरीने चर्चा वाचायला मिळतात, पण रोजच्या आयुष्यात सामो-या येणा-या गंभीर विषयांवर, प्रॅक्टिकल बाबींवर फार कमी लोक बोलताना दिसतात. Sonali Navangulचं नाव आवर्जून घ्यायला हवं त्यात.
सध्या अवतीभोवती अनेक मित्रमैत्रिणी, त्यांचे पालक एकेकटे रहाताना दिसतात. कुणी नाईलाजाने, तर कुणी स्वेच्छेने. ह्यामागे कारणं अनेकानेक आहेत. सगळ्यांचं त्या त्या ठिकाणी बरोबर आहे, कुठे क्वचित आडमुठेपणाही असेल, पण थोड्याफार प्रमाणात तो सगळीकडे असतो. हा सगळा मित्रपरिवार बहुतांशी चाळीशी ओलांडलेला आहे, तर पालकवर्ग सत्तरी ओलांडलेला. (चाळिशीखालच्या लोकांनाही लागू असतील हे मुद्दे, पण त्या ब-याचजणांचा प्राधान्यांचा प्रवास अजून सुरू असतो.) काहींची मुलं शिकत आहेत, त्यांची मुलं काही वर्षांनी बाहेर पडणार आहेत. त्यांनाही पुढचा विचार आहेच मनात. एकटेपण स्वेच्छेचं असो, की लादलेलं, सर्वसामान्यपणे केव्हातरी तात्पुरत्या काळासाठी तरी सोबत हवी असं वाटतं. अगदी आजारपणात किंवा नाजुक मन:स्थितीतच असं नव्हे, पण काहीतरी छान घडलं, तर तो आनंद कुणाला तरी सांगून वाटून घ्यावासा वाटतो. पण ते तेवढ्यापुरतंच असावं, आपल्या नेहमीच्या आयुष्यामधे त्याहून जास्त कुणी नको, अशीही मन:स्थिती असते. माझ्याभोवती एकटे रहाणारे बहुतेकजण आपापल्या नोकरी-उद्योगात, काही ना काही छंदात गुंतलेले आहेत. प्रसंगपरत्वे आपापल्या कंपूत रमलेले असतात. अगदी ज्ये ना सुद्धा छानपैकी वेळापत्रकं, तब्येती सांभाळतायत, पण तरीही ते एकटेपण कुठे तरी सापटीत, सांदी-कोप-यात साकळलेलं असतंच.
अशा सर्व मंडळींकडे पहाताना, त्यांच्याबरोबर वावरताना फार काळापासून एक कल्पना मनात रेंगाळतेय. आपलं असं एखादं उबदार कम्युन असावं आणि तिथे सगळ्यांनी एकमेकांचे शेजारी म्हणून रहावं. म्हणलं तर स्वतंत्र, म्हणलं तर एकत्र. एका विशिष्ट सर्वसमावेशक किंमतीची प्रत्येकाच्या आवाक्यात येतील अशी चिमुकल्या घरट्यांची वसाहत, घरामधे एक स्वैपाकघर, बैठकीची खोली, पडवी, पुढे-मागे छोटी छोटी आंगणं, 'कथा दोन गणपतरावांची' चित्रपटात जशी लागून घरं असतात, तशीच. एका हाकेत कुणालाही बोलवावं, कुंपणावर उभं राहून गप्पा हाणाव्यात, मध्यरात्रीपर्यंत पडवीत किंवा आंगणातल्या चांदण्यात एकटं किंवा दुकटं/तिकटं वाचत बसावं, दोन चार फुलझाडं डोलवावीत, ज्यांना स्वैपाक आवडतात ते एकत्र स्वैपाक करतील, ज्यांना घरगुती गप्पा आवडतात ते आपले फड जमवतील, ज्यांना एकेकटं शांतपणे काम-लेखन-मनन करायचंय ते स्वत:त असू शकतील. एरवी रोजची आयुष्यं आत्ता आहेत तशीच आपापली सुरू रहातील. पण असं असूनही जेव्हा ज्याला आवश्यकता असेल तेव्हा तिथे कुणी ना कुणी उपस्थित असेल. आनंदाच्या प्रसंगी. पालकांशी किंवा मुलांशी चकमकी झाल्यावर. काहीतरी छान पाहिल्या-वाचल्या-ऐकल्यावर चटकन कुणाला तरी सांगण्यासाठी. अशा अनंत गरजा असू शकतात.
हे अगदी आदर्शवादी चित्र आहे. प्रत्यक्षात उतरवणं अनेक कारणांनी अवघड आहे. आपापल्या नोक-या, शहरं, वयोगट, आर्थिक परिस्थिती, एकत्र येणं, आपापल्या स्वभावांवर आणि मतांवर ठाम असणा-या मंडळींना कल्पना पसंत पडणं, परवडेल अशा दरात एवढी मोठी जागा शोधणं, कायदेशीर बाबी, वसाहत उभी करणं, दळणवळण, घडी बसवणं, एकत्र येणा-या कंपूंमधे मागाहून मतभेद उद्भवणं, बरंच काही. हे प्रयोग अन्यत्र झालेले असावेत, माझं फारसं वाचन नाही, पण कल्पना करायला काय हरकत आहे, एवढा अगदीच प्राथमिक विचार आहे. त्या दिशेने कसलीही तयारी, चाचपणी केलेली नाही.
म्हणून ब-याच कालावधीपासून मनात असूनही ते मांडावं की नाही हा संभ्रम होता. पण गेल्या काही दिवसांमधे काही घटना अशा घडताहेत, की ही कल्पना निदान बोलून तरी दाखवण्यात काहीच हरकत नाही असा विचार वारंवार यायला लागला. शेवटी आज हे लिहीलं. मला ते नीट लिहीता आलंय की नाही कल्पना नाही, पण मुद्दा समजून घेण्याइतपत सर्व सूज्ञ आहेत. हे खूप वरवरचे मुद्दे आहेत, सगळं तपशीलवार लिहीण्याला मर्यादा आहेत, पण ते सर्व मुद्दे आपण मिळून चर्चेत आणू या, ह्यावर बोलू या. कल्पना पटली नसेल, बालीश असेल तर तसंही स्वच्छ सांगू या. इथे खूप छान आणि अभ्यासू सुजन प्रचंड संख्येनं आहेत, त्यांचा सहभाग विशेष अपेक्षित आहे. त्यांच्याकडून उत्तम उपयुक्त मुद्दे पुढे येतील असं वाटतंय. :-)
Subscribe to:
Comments (Atom)