सुरेखा सिकरींना पहिल्यांदा दूरदर्शनवर 'गोदान'मध्ये बघितलं होतं. ठळक. जबरदस्त इंपॅक्टिंग. मग दूरदर्शनच्याच दुपारच्या महिला स्पेशल पण खूप सुंदर, अर्थपूर्ण असणा-या मालिकांमध्ये दिसायच्या. नंतर तमस, झुबेदा वगैरे चुकतमाकत आठवतायत. अधेमधे टीव्ही सर्फिंग करताना कुठल्या तरी हिंदी मालिकेत कितीतरी वर्षं दिसत होत्या. तोंडी हिंदीची कुठली तरी वेगळीच बहिण होती आणि गेटअप पण निराळाच काहीतरी. अलिकडे 'बधाई हो'त गजराज आणि नीनाबरोबर तर धमाल आणली होती त्यांनी. फार सुरेख आणि लक्षवेधक अभिनेत्री.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Friday, July 16, 2021
Subscribe to:
Comments (Atom)