म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, March 31, 2023

 #hostellife #hostelworld #hostel

अगदीच.
जे जे पीजी राहिलेत त्यांनी आपापल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचा खजिना खुला करायला हवा. सौरभ भोसलेचं एक रीळ बघताना मी माझ्या आठवणींच्या गल्लीत धमाल भटकून आले. कडू, आंबट, तिखट, तुरट सगळे रस बाय डिफॉल्ट होतेच, ते आज पुलाखालून वाहिलेल्या महासागरानं गोड करून टाकलेत. वाक्य जामच क्लिशे आहे, पण माणसांच्या अनुभवाबाबतीत आताशा तरी युनिक असं जगात काही असतं असं मला वाटत नाही. थोडं पुढे मागे, वर खाली, डावं उजवं असेल फारतर, पण तुमचं आमचं तसं बघायला गेलं तर सगळं सेमच असतं. जशा अगदी जीवाभावाच्या आणि जेन्युईन रुममेट्स भेटल्या, तसेच वेगवेगळे नमुनेसुद्धा. शिक्षण, खाणं, रहाणं, पैसे, लाईफस्टाईल, स्वातंत्र्य, एकटेपणा, जबाबदारी, वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंट्स, मल्टिटास्किंग, संवाद, समाज, संस्कृती, स्वच्छता, कुटुंब, पार्श्वभूमी, ताण, आजारपणं, अपघात कितीतरी बाबींना माणूस एकावेळी तोंड देत असतं. केवळ शिकण्यासाठी हॉस्टेल किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांच्या आणि नोकरीसाठी बाहेर रहाणाऱ्या लोकांच्या बाबतीत यातले बरेचसे मुद्दे कमी होतात किंवा त्यात भर पडते. पण दोन्हीही अनुभव पुढच्या आयुष्यात आठवून आठवून हसण्यासाठी, स्वतःबद्दल अभिमान वाटून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. भले एखाद्याला चांगला अनुभव नसेल, पण तो/ती हॉस्टेलचे दिवस खूप धमाल होते हे नाकारणार नाही.
कोण कोण हॉस्टेलवर / पीजी म्हणून राहिलेत, त्यांनी आपापल्या वॉलवर वेगवेगळे भाग करून अनुभव लिहा. एक छानशी मालिका होईल.

Thursday, March 16, 2023

 कॉमन गुगल डॉकमध्ये काम करताना दर वेळी 'हो, मीच आहे ' असं सांगताना दर वेळी नीलला लहानपणी घरी एकटं ठेवून बाहेर जाऊन परतल्यावर त्याला दार उघड म्हणून सांगताना 'हो, मीच आहे ' सांगायचो, ते आठवतं.

Saturday, March 11, 2023

 रोजचे, घरचे, दारचे, उन्हाळ्याचे रंग