म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, May 18, 2023

 हे पॉडकास्ट ऐकलंत का? नसल्यास, प्लीज ऐका. पालक असला नसलात तरी ऐका.

डॉ. शुक्ल has been a light house. मला खूप छान वाट दाखवलीये त्यांनी.
https://www.youtube.com/watch?v=EQ1gfaKZUp4

Saturday, May 13, 2023

 आपापल्या चिमुकल्या विश्वात मनापासून दंग असलेली माणसं कसली सुंदर दिसतात ना! मारीया कित्येक वर्षं अशीच दिसतेय. तिचा रेसिपी शो मी निव्वळ तिच्या देखण्या हालचाली, तिचा स्वैपाकघरातला - मग ते सेटवरचं तात्पुरतं का असेना - नाच केल्यासारखा सराईत वावर, तिच्या अॅक्सेसरीज, तिची भांडीकुंडी, तिनं वापरलेले तिला अत्यंत शोभणारे रंग आणि कापडांचे पोत, जगभरातले अगम्य जिन्नस, आपुलकीनं ओथंबलेला आवाज, चमकणारे डोळे आणि घरगुती हसणं, या सगळ्या सगळ्यासाठी बघत रहाते. आपण करतोय ते अगदी सोपंय, काही नाही त्यात, असा एकंदरीत आविर्भाव असतो. बघा की, यात नुसता वाईनमध्ये परतलेला कांदा मावेत कुरकुरीत केलेल्या पावावर पसरून खायचाय. बाकी तुम्ही त्यात कोणता एक्झॉटीक साखऱ्या घालताय किंवा कोणतं तोंड वेंगाडवणारं नाव देताय, काही काही महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचा असतो तो हा एकत्र सोहळा.

स्वैपाक मनापासून आवडणाऱ्या आणि करणाऱ्या बायकांचे चेहरे उत्फुल्ल दिसतात. (हे वाक्य मी आयुष्यभर इतक्यांदा वापरलंय आणि वापरणारे की बस्स) बाकीच्या लाख विवंचना उरलेल्या खोल्यांमध्ये सरकवून कोंबून ओटा नामक आयतात त्या जी काही डाईव्ह मारतात, ती थेट आपल्यासकट दुसऱ्या जगात!
ता.क. - ही पोस्ट मारीयापर्यंत पोचली आणि तिच्याकडून अभिप्राय आला🥳 खुशच झालेय मी💫✨🌟 अनंत वेळा थॅंक्यु Harshad Ramchandra Pendse 🎉😇
मारीयाच्या अभिप्रायाचा फोटो कॉमेंटमध्ये.
https://www.youtube.com/watch?v=nfjlCvkPKKg


Sunday, May 7, 2023

 लाफींग पार्टनर्स. हास्य दिनानिमित्त.

डोळे घळघळेपर्यंत गडगडाटी केव्हा हसला होतात इतक्यात?