म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, February 20, 2024

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

AI4Bharat ही IIT मद्रासमधील एक रिसर्च लॅब आहे, जी भारतीय भाषांसाठी ओपन सोर्स डेटासेट, टूल्स, मॉडेल्स आणि अॅप्लिकेशन्स विकसित करण्याचे काम करते आहे. गेल्या वर्षभरापासून, आम्ही आपल्या संविधानात नमूद असलेल्या २२ भाषांसाठी संपूर्ण भारतातून स्पीच डेटा (नेटिव्ह स्पीकर्स रेकॉर्डिंग) गोळा करत आहोत. मराठी भाषा ही त्यातीलच एक असल्याने आम्ही विदर्भातील जिल्ह्यांमधून काही डेटा गोळा केला आहे. आता, त्याचाच पुढचा टप्पा रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पुणे येथे सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी, आम्ही ४-५ समर्पित टीम मेम्बर्स शोधत आहोत जे मराठी डेटा कलेक्शन टीमचे कोअर टीम मेम्बर म्हणून काम पाहतील.
जबाबदाऱ्या:
एका जिल्ह्यात १००-१५० लोकांना गोळा करणे आणि त्यांचे रेकॉर्डिंग करून घेणे.
लोकल कोऑर्डिनेटर शोधणे.
१-२ आठवड्यांच्या संकलन कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहणे.
रेकॉर्डिंग साठी ठिकाण शोधणे आणि इतर लॉजिस्टिक्स गोष्टी हाताळणे.
पेमेंट, बजेट आणि डेली अपडेट्स कोर टीमपर्यंत पोहोचवणे.
आम्ही काय शोधत आहोत:
सामाजिक पोहोच असलेली किंवा ती निर्माण करण्याची तयारी असलेली एखादी व्यक्ती.
लोकांची जमवाजमव करण्यासाठी स्थानिक शाळा, स्वयंसेवी संस्था, इत्यादींशी संपर्क साधू शकेल अशी एखादी व्यक्ती.
व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स उत्तमरीत्या हाताळू शकेल अशी व्यक्ती.
भाषा आणि तंत्रज्ञानाची आवड असणारी व्यक्ती.
या ४ जिल्ह्यांमध्ये प्रवास करू शकेल आणि किमान आठवडाभर तिथे राहण्याची तयारी असलेली व्यक्ती.
मराठी भाषेची समज असणे आवश्यक आहे.
नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
कृपया तुमचा सीव्ही kunalgandhi@ai4bharat.org वर पाठवा किंवा तुमच्या माहितीतील या कामासाठी योग्य असलेल्या व्यक्तींशी ही माहिती शेअर करा.
धन्यवाद.

Saturday, February 10, 2024

 Happy happy birthday to the best buddies!

🌿🌳😘
तुमच्या खोड्या आणि टवाळक्या बघत आम्हां मायलेकांचं तासंतास लोळणं आणि मनमुराद हसणं सदोदित चालूच राहणार.
पोरग्याच्या झपाट्यानं बदलणाऱ्या दुनियेत तुमचं स्थान मात्र आजही अढळ आहे. शेरलॉक, फाफे, हॅरी वगैरे अक्षर ओळखीनंतरचे सवंगडी, पण तुम्ही उष्टावणापासूनचे खेळगडी😘
Can't ever thank you guys enough! Keep rocking🎸🎶🎶