म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, December 15, 2013

जादूगार कौशिकी चक्रवर्ती!!

 Ashok Patil's photo.
Salute to Kaushiki Chakravarti.... !!!!
Outstanding and stunning performance... simply brilliant... !!!

अत्यंत नावीन्यपूर्ण आणि बुद्धिमान सादरीकरण, खणखणीत तयारी, प्रसन्न आणि हसरे हावभाव, तीनही सप्तकात लिलया फिरणारा आवाज आणि प्रत्येक स्वरावरची आत्मविश्वासाने निथळणारी हुकूमत... इतक्या लहान वयातही सभेला जिंकण्याचं, स्तब्ध खिळवून ठेवण्याचं जबरदस्त सामर्थ्य कमावलेली गायकी! ती थांबली तेव्हा माझ्या डोळ्यात सरसरून आलेलं पाणी, सर्वांगावर फुललेला काटा, एका क्षणासाठी सभोवार निर्माण झालेली अद्भूत शांतता आणि त्यानंतर श्रोत्यांनी उभं राहून टाळ्यांच्या दणदणीत गजरात दिलेला बहुमान...  या वर्षीची सवाई महोत्सवातली सर्वोत्तम मैफल… UNFORGETTABLE...

Thursday, October 10, 2013

आजचे विशेष..

माहिती नाही पण आज दिवस चांगला चालू झाला, उगीचच जाग आल्यावर सक्काळी सक्काळी अंथरुणातच काही छान आणि आवडत्या आठवणी आल्या, सकाळी उगीचच सगळी कामे वेळेत झाली (रोज उगीचच उशीर होत असतो, का याला काही उत्तर नाही ) निवडायला खूप उशीर करूनही हिरव्या माठाने तग धरला आणि मावशींनी मला हवी तशी चरचरीत परतलेली भाजी केली, पांढरे वाटाणे एरव्ही टणाटणा उड्या मारतात पण आज अगदी मनासारखे शिजले, योगेशने न कुरकुरता सकाळी नारळ फोडून दिल्यामुळे ओल्या नारळाच्या करंज्या झाल्या, ठरवलेला बेत डब्यांमध्ये जाउन बसला, नीलने पटापट आवरून घेउन नेहमीसारखंच आनंदाने टाटू केलं, वेळेत बाहेर पडले, झाडून सगळे सिग्नल्स माझीच वाट बघत असल्यासारखे हिरवे मिळाले, कोल्हापूरहून अनपेक्षितपणे आत्याचा कडाकण्या पाठवत असल्याचा फोन आला आणि पोचल्याबरोबर साधेसेच पण आवडत्या मैत्रिणिंचे gm मेसेज येउन पडले होते मी वाचायची वाट बघत…  संध्याकाळी मायबोलीवर एक सुरेssssख लेख मालिका वाचली... सुरुवात चांगली झाली की मग पुढचा दिवसही तसाच स्मूथ जात रहातो…

पुरे झाली की एवढी कारणं आनंद आणि आनंदी होण्यासाठी… रोजच्या आयुष्यात आणखी काय शोधायचं आणि रोज नवं तरी काय घडणार?

Wednesday, October 2, 2013

Noticing the change in me...

इसापनीती वाचतेय… काही गोष्टी छान आहेत मुलांना सांगण्यासारख्या, काही ब-या, काही अजिबात न सांगण्यासारख्या. पण प्रत्येक गोष्टीखालचे 'तात्पर्य' वाचून मात्र हसावे की रडावे कळत नाही ! ह्याच गोष्टी आणि तात्पर्ये शाळेत असताना मात्र किती मन लावून वाचली होती !!

Wednesday, September 25, 2013

'बुचाची फुले'

सप्टेंबर स्पेशल…

आकाशनिंब, गगनजाई, गगनमोगरा…. काहीही म्हणा पण ही माझी लाडकी 'बुचाची फुले'… म्हणजे मूर्तीमंत प्रसन्नता आणि घ म घ मा ट !!!
वेडsssssss आहे मला या फुलांचं…

या मोसमात पुण्यात रस्त्यावर पडलेल्या बुचाच्या सड्यातुन फुलं वेचताना कुणी दिसली तर ती मी असू शकते…

 PhotoPhotoPhoto

Sunday, August 18, 2013

Ideal Sunday...

cleaning, preparation for coming week, clearance of many pending jobs, an all favorite yet time saving menu and a sound afternoon sleep of an hour = a near to perfect Sunday!

Thursday, July 25, 2013

What an impressive thought really...

"Meeting good and true people is like entering in perfume shop. Whether you buy anything or not, you are bound to receive the fragrance."

I just loved this beautiful thought.… 

Thursday, March 7, 2013

आला उन्हाळा...

 उन्हाळ्याची चाहूल नक्की आधी  कोण देतं ??

सिग्नल्सवर येणारे मोग-याचे गजरे की सकाळमधले 'झळा दुष्काळाच्या / हरवलेले पाणी - करपलेली गावे' ?

दोन्ही एकाच सुमारास असं काही सुरु होतं की मन द्विधा होऊन जातं!! 



Tuesday, February 12, 2013

नीलची सवारी !

काल आमच्या देव्हा-यातले देव नीलच्या कारमधून ड्राईव्हला गेले होते… फिरायला नेतो म्हणे तुम्हाला!
 गणपतीबाप्पा स्टीयरिंग व्हीलवर, शेजारच्या सीटवर अन्नपूर्णादेवी विराजमान झालेल्या अणि मागच्या सीटवर लंगड़ा गोपाळकृष्ण :-)

बरं वाटलं असेल नाही त्यांनाही ज़रा वेगळ्या वाहनातून वेगळ्या चालकाबरोबर फिरताना… !!