ध्यानीमनी
नसताना धाडकन अचानक तुमच्या छान मैत्रीणीचा फोन येतो, वेळ काढ, ताबडतोब
भेटू या असा… मी रिकामी आणि ही माझ्या शतपट गुंतलेली! अनंत व्यापांत
स्वत:हून गुरफटलेली, काही महिने भारतात काही बाहेर असे हेलपाटे घालणारी,
त्यातच स्वत:चे छंद - तब्येतीची काळजी हे सगळं नीट सांभाळून असंख्य
कार्यक्रमांना हजेरी, प्रचंड अवाढव्य मित्रमंडळ आणि स्वत:चा गोतावळा आणि
त्यांच्याशी सतत चाललेला संवाद, तरीही या सगळ्यातून आयुष्य जगायचं मात्र मुळ्ळीच न विसरलेली…
मी किती वेळ काढते स्वत:साठी, माझ्या लोकांसाठी, मित्रमंडळीसाठी? किती दिवस झाले कुणाकुणाशी बोलून, कुणाकुणाला भेटून!! लई दिवस, बक्कळ महिने, युगं?? कदाचित…तिच्या एका फोनने काय काय केलं? मला मस्स्स्स्त सरप्राईज दिलं, खूप आनंद झाला आणि खूप विचारही करायला लावला…
मैत्रिणी अशाच हव्यात, हो की नाही ? श्रीमंत मी !!!!!

No comments:
Post a Comment