म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, June 26, 2017

मुझे मिल गया बहाना तेरी दीद का
कैसी खुशी लेके आया चाँद ईद का

Sunday, June 25, 2017

नॉस्टॅल्जिया

मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या. रोज सकाळी शाळेत जाताना घुडणपीर दर्ग्यातनं शॉर्टकट घेत भाऊसिंगजी रस्त्याला लागायचं, मग ज्योतिबा रोडनं घाटी दरवाजातनं देवळात थेट आत शिरायचं, गाभा-यासमोर उभं राहून अंबाबाईला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायची, मग पुढे महाद्वारातनं बाहेर पडून शाळेची वाट पकडायची. हा रोजचा परिपाठ. आज निव्वळ अविश्वसनीय वाटावा असा.

मोमीन, बागवान, दोडमणी, टिनवाले, कांचवाले, शेख असे सख्खे शेजारी. समोरच्या गल्लीत बाबांचे जीवलग मित्र रमजान मण्यार. रमजानकाका आणि बाबा एकदा ट्रक चालवत बेंगलोरला गेलेले वगैरे. आई भेंडे गल्ली पोस्टात जायची, तिथंही शेख म्हणून पोस्टमास्तर होते, त्यांच्या घरी सगळे डिस्टींक्शनवाले होते तेव्हा. बाकीचे काही आठवत नाहीत. शाळेत माझी बाकमैत्रिण रेश्मा बागवान. शनिवारच्या सकाळच्या शाळेसाठी माझी आई कधीच डबा द्यायची नाही, सकाळी निघताना पेलाभर दूध आणि मग थेट घरी जाऊन पानावर. रेश्माची आई मात्र दर शनिवारी डब्यात तुपावर खरपूस भाजलेले मिल्कब्रेडचे गोडसर स्लाइसेस आम्हा दोघींसाठीही पुरेसे द्यायची. मनात रुतलेली फार हृद्य आठवण आह तीे. आजही हिवाळ्यातल्या गारेगार सकाळी त्या डब्याच्या आठवणी येऊन मनाला उब येते. आमच्या घरामागच्या इमारतीत प्रसिद्ध गायिका गुलाबबाई कागलकर रहायच्या. दोन गल्ल्या जोडणा-या टिनवाल्यांच्या घरातनं ये जा करायचो. पकडापकडी खेळताना एकदा ते कुटुंब गोल करून अन्नाची भांडी मधे घेऊन जेवायला बसलेलं होतं. तरी आमची बाजूनं मागनं पळापळी चाललेलीच असताना मी धाडकन आमटीच्या पातेल्यातच पडले! तेव्हापासून मला घरात काय म्हणातात ते म्हणतातच. ते सांगायचं नसतंय.

टिनवाले वगळता बाकीची घरं लख्ख. रमजानकाका, पोस्टमास्तर शेखांकडंं तर चेहरे पाहून घ्यावेत इतकी नितळ फरशी आणि भांडी. रमजानकाका सुरमा आणायचे, आमच्या आजोबांना लागायचा. मग आजोबा आमच्याही डोळ्यात काडी फिरवायचे. अहाहा! शांत शांत वाटायचं. रमजान ईदला शिरखुर्म्याची किटली यायची. बकरी ईदला आठवडाभर आधी प्रत्येकाच्या परसात बक-या मुक्कामाला यायच्या. मग ते चा-यांचे भारे, लिदामुताचे विशिष्ट वास, त्यांचं दिवसागणिक वाढत जाणारं आणि शेवटच्या दिवसाला पुढची चाहूल लागलासारखं भासणारं करूण बेंबाटणं, आठवड्याभरात होणारा पुष्ट बदल. बोहरींच्या मशिदीत ईदच्या आधी आकांत सुरू व्हायचे, छाती पिटून, पिळवटलेल्या प्रार्थना करत स्त्री पुरुष निर्दोष असल्याचं कळवळून सांगत रहायचे. सकाळ संध्याकाळ करूण रुदन आणि बघवणार नाही इतका आत्मक्लेश.

प्रत्यक्ष ईदच्या दिवशी दारांबाहेर पडलेले मांडव, परसात पेटलेली चुल्हाणी, त्यावर मोठमोठ्या पातेल्यातून शिजणारे खाटखुट आणि खास त्यासाठी आलेले खानसामे, पाहुण्यांनी भरलेली घरं, पठाणी कुडते आणि क्रोशाच्या सुंदर टोप्या घातलेल्या यजमानांची लगबग, सजलेली पळणारी बागडणारी मुलंमुली, मेंदीनं हात (वडीलधारे स्त्री पुरुष केसही रंगवलेल्या) रंगलेल्या, ठेवणीतल्या झगमगीत साड्या पेहेनलेल्या आणि मोठमोठाले झुमके, जडजड खास नजाकतीचे मोठालेच दागिने घातलेल्या स्त्रियांच्या आचारी ते पाहुणे अशा येरझा-या, मोठ्यानं रंगलेल्या बागवानीतल्या गप्पा, मुलांवर चाललेली आरडाओरड, आसमंतात गच्च भरून दरवळणारे बिर्याणीचे खमंग वास असा माहौल असायचा. खूप आनंद असायचा हवेत. दिसायला आधीच छान असणारे लोकं आणखीच छान, तर बेतास बात असणारेही खुललेल्या चेह-यामुळं देखणे दिसायचे. कौसर, रुबाब, दिलशाद, उम्मेहानी, परवीन, शाहीन, बिल्लाल, सगळे धांदलीत असायचे. बोहरींच्या मशिदीत बुरख्यांचे आणि पुरुषांच्या टोप्यांचे अत्यंत सटल रंगसंगतींचे आणि कलाकुसरीचे अत्यंत बहारदार नमुने दिसायचे. फुलांचे ताटवे फुलल्यासारखं दृश्य असायचं ते. आमच्या खालीच मारियाताई, जोहेबदादा, मुन्नीताई, नफीसाताई रहायचे, आम्ही त्यांच्याकडे एकाच भल्यामोठ्या थाळ्यात पण वेगवेगळे वाटे करून सगळे मिळून एकत्र जेवायचो. असं असूनही कधीही कुणी आम्हाला आमच्या आहाराचा भाग नसलेलं काहीही खायला घातलं नाही. आमच्या घरच्यांनाही कधी कसल्या शंका नव्हत्या. दिवाळीला आमची फराळाची ताटं सगळ्यांकडं फिरायची.

दरवेळी ईद येऊ घातली की हे सगळं ओळखीचं, स्मरणात मुरलेलं मनाच्या पृष्ठभागावर दुधावरच्या सायीसारखं तरंगायला लागतं. माझ्याइतकेच आमचे आत्याकाकालोकंही ह्या स्मरणरंजनात रेंगाळतात. ईदचं त्यामुळं मनात एक खास खास स्थान आहे. तिला निर्धास्त स्वच्छंद बालपणाचा, आनंदाच्या दिवसांचा, निखळ शेजाराचा, निर्व्याज मैत्रीचा, धर्मरहीत आपलेपणाचा, मोठ्यांमधल्या समंजस विश्वासाचा, कानांवर प्रभातवंदनइतक्याच प्रभावीपणे सुरेल संस्कार करणा-या अजानचा, गोड बागवानीचा, सौहार्दाचा, हवेतल्या घट्ट सुरक्षिततेचा असे अनंत सुगंध लगडलेले आहेत. दरसाल बिल्लाल मुल्ला ईदला न चुकता खूप अगत्यानं शिरखर्म्याचं आमंत्रण करतात आणि मी हे सगळं पुन्हा अनुभवून घेते. सुखाचं असतं ते. ऊर्जा पुरवणारं, आयुष्य वाढवणारं. हे वातावरण भोवती असल्याचं मोल आज प्रकर्षानं जाणवतं आणि भाग्यवान वाटतं. माझ्या लेकालाही हे असं अनुभवायला मिळालं तर माझ्या खुशीला चारचाँद लागतील. कारण अगदी कुबेराइतकी ऐपत असती तरी हे बाजारातून विकत घेऊन देता यायचं नाही!

काल सगेसोयरे मिळून मुद्दाम मोमिनपु-यात इम्दादीत जाऊन असेच काही आठवणींचे क्षण पुन्हा वेचून आलो. आम्ही घासफुसवाले त्यामुळे फिरनी, तहुरा, खरबुज फालुदा, शाही तुकड्यापर्यंतच मजल मारली. पण जे सर्वाहार घेतात, त्यांनी अवश्य भेट देऊन आस्वाद घ्यावा असं ठिकाण आहे.

सर्वांना मनापासून ईद मुबारक :-)

Thursday, June 22, 2017

एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.

मध्यमवयीन, शेलाटी, जीन्समधले लांब पाय, हल्ली स्टायलीश रुपेरी छटा वागवतात तशी पोनी वगैरे. माझ्या उडत्या दृष्टीक्षेपातलं हे चित्र. उद्रेक झाला होता तिचा. जो कुणी सोबत होता त्याच्यावर. मोठ्या आचेवरच्या दुधासारखी ती भसाभसा नुसती उतू जात होती. कुण्याकाळापासूनचं किती काय काय साचवलेलं, दडपलेलं आज काळवेळ ठिकाणाचा मुलाहिजा न राखता सैरावैरा झालं होतं बहुतेक. कशाकशाचंही भान नव्हतं तिला. डोळ्यांच्या घळघळण्याचं, बेंबीच्या देठापर्यंत पोचलेल्या आवाजाचं, तिची रथसप्तमी आयती पहाणा-या समोरच्या गर्दीचं, त्या सोबत्याचं, स्वत:चं. उलट्या जशा थोपवता येत नाहीत तसं त्या वेळी फक्त आतलं साठवण्याच्या कक्षेबाहेर पोचलेलं बाहेर फेकलं जात होतं. हा सगळा निव्वळ 90-120 सेकंदांचा खेळ. मला ऐकू आलेला, काहींनी हौसेनं बघितलेला.

मला हिरवा कंदिल मिळाल्यावर मी निघाले, पुढे तिचं काय झालं असेल माहिती नाही. कारण काही असेल, घरात काही बिनसलं असेल, दोघातला बेबनाव असेल, तिस-याच कुणाचा तरी उद्वेग ह्याच्यासमोर उफाळला असेल, तब्येतीची काही तक्रार असेल, अपयश असेल, तिची स्वत:ची काही चूक असेल, जे काही होतं ते अत्यंत तीव्र होतं एवढं खरं. पण तिथून निघाल्यावर उगीचच मला वाटलं की त्या आवेगाच्या क्षणी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर थोपटायला हवं आपण. तिच्या तिच्या काय त्या जखमा आणि आता त्यावर मीठ चोळल्यासारख्या ह्या अनोळखी नजरांच्याही जखमा. अर्थात पूर्णपणे खाजगी बाब चव्हाट्यावरच उघड झाल्यावर हे अटळ आहे. आच कमी झाली की उतू जाणं आपसूक खाली बसेल, पण ही चव्हाट्यावरची जखम खात राहील तिला. मनात असो, नसो, संयमाबरोबर काळवेळ आणि ठिकाण हे अहिमही बाळगावेच लागतात, नाहीतर रांगोळी फिसकटलीच समजायची. मुद्दा तोही आहे आणि,

मुद्दा हाही आहे की त्या अनोळखीसारखे काही चेहरे मला माझ्याभोवतीसुद्धा दिसतात. मित्र, मैत्रिणींमधे. असं वाटतं की त्यांनी खूप दडपलंय आत काहीतरी, तो कोंडलेल्या वाफेचा दाब चेह-यावर, सगळ्या वागण्यावावरण्यावर कंदिलावरच्या काजळीसारखा स्पष्ट जाणवतोय. त्यांनाही जवळ घ्यायला हवंय, पाठीवर हात फिरवायला हवाय. जवळ घेणं सोडा, नुसतं अलगद बोट टेकवलं तरी पिकलेलं गळू फुटल्यासारखे ते भळभळ वाहतील आणि सगळी साचलेली ठणक काही क्षणात विरून जाईल, ते मोकळे, निरभ्र होतील, खळखळून साजरं हसतील. आनंदानं हरखतील, दु:खानं रडवेली होतील. स्वत:च्या आणि इतरांच्याही. खरीखुरी. वेळच्या वेळी.

पण जर असं काही केलं तर हल्ली व्यक्तीवाद, स्पेसेसबिसेस देण्याच्या जमान्यात हे फारच अतिक्रमण होईल, त्यामुळं मनात लाख वाटलं तरी तसं करता येत नाही प्रत्यक्षात. दिसतंय ते तसं नाही हे दिसत असूनही ते तसंच आहे असं बजावून बघावं लागतं. पण हीसुद्धा मैत्रीच. असतात काही गोष्टी निशिद्ध. असो, त्या अनोळखीचे प्रश्न काय असतील ते असतील, पण सध्या तरी ती रिती होऊन हलकीफुलकी नक्की झाली असेल एवढं खरं. त्यापायी माझे मात्र हे शब्दांचे फुकाचेच बुडबुडे.

Friday, June 16, 2017

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू |
जय हरी विठठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल||

#आषाढी एकादशी

Monday, June 12, 2017

पुलं, तुमच्यामुळे आयुष्य सुसह्य आहे _/\_

Saturday, June 10, 2017

हुरुप, आत्मविश्वास, समाधान. असं काही वाचलं की जे होतं ते होतंच.
थँक्स फॉर शेअरिंग Manish Kumar :-)

#homeschooling

Wednesday, June 7, 2017

Parineeta Dandekarसाठी खास.
तुझ्या पोस्टस् वाचताना आपोआप आणि हमखास मनात बॅकग्राउंडला हे वाजत रहातं.
इथेही त्रिवेणी संगमच आहे एका अर्थानं.

#ये नीर कहांसे बरसे है

Thursday, June 1, 2017