खूप उशीर झाला आपल्याला यायला आज. दारं खिडक्या उघड. सगळीकडे चक्कर मार. घराला कसं वाटत असेल, आपण दिवसभर एकटं टाकून जातो बिचा-याला! आपल्याला बघितल्यावर आता त्याला बरं वाटलं असेल बघ.
- नीलची आई
हो, नक्की नाचत असेल. घर सजीव असतं.
जेव्हा ते तयार होत असतं, तेव्हा ते बाळ असतं.
जेव्हा त्याला खिडक्याबिडक्या लावून, रंगरंगोटी करून, आपण त्यात रहायला येतो, तेव्हा ते तरूण असतं.
जेव्हा त्यातनं माणसं दुसरीकडे निघून जातात, तेव्हा ते म्हातारं होतं.
जेव्हा ते पडून जातं, तेव्हा ते घर मेलेलं असतं.
जे जे घराला पाडू शकतात, जसे बुलडोझर, भूकंप, चक्रीवादळ, आग, हे सगळे घराचे खूनी असतात.
- निळे बोल!