आज सकाळचं धुकट.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Saturday, September 28, 2019
तालवाद्य नाहीच ह्यात. ऐकताना तो दिवा जणू कानातही तेवत रहातो. परिपूर्ण शांतरस आहे. साधना त्या वातावरणाला साजेशी वावरते. सांजवाती उजळवतानाचं गांभीर्य, पण दिलासादायक, आशादायक, असा काहीतरी विशिष्ट भाव स्वरांमधून तंतोतंत आपल्यापर्यंत पोचतो. त्यात अंधाराशी संघर्ष, झगडा नाही, अलगद त्याचा हात सोडून प्रकाशाचा हात पकडणं आहे. सलिल चौधुरी+लता हे कमालीचं अद्भुत रसायन आहे.
मेरे मन के दिए - परख
Thursday, September 5, 2019
सकाळी सातच्या बातम्यात किरण नगरकर गेल्याचं कळल्यावर पाठोपाठ अविनाशची आठवण आपसुकच येणार होती, Avinash Chavan. ही नगरकरांच्या स्वाक्षरीसह असलेली 'सात सक्कं'ची खास प्रत तर जणू मौल्यवान चीज होती त्याच्या खजिन्यातली. नगरकरांची माझी ओळख त्याच्यामुळेच. त्या ओळखीमुळे माझं वाचन वरच्या इयत्तेत गेलं. सो मेनी थँक्स!
Subscribe to:
Comments (Atom)