म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, March 14, 2022

 रविवार+शाळूमैतरणी=आनंद.

संजीव सावळवाडेंचं नवं डोसा हाऊस पसंत पडलेलं आहे.




Monday, March 7, 2022

 माझ्या डोळ्यासमोरची सशक्त स्त्री. आणि खरंतर पुरुषही.

विचार, निर्णय, स्टॅंड्स, कर्तृत्व, शैली, जाणिवा, जगणं, छंदोपासना आणि कामातून उभी केलेली तगडी जरब, दरारा - सगळं अस्सल स्वतःचं, बाईपणाचं भांडवल नसलेलं. ना ईझम्स, ना माज, ना वचावचा बोलणं, ना स्पष्टीकरणं. आणि हे स्त्रिया आणि पुरुष, दोघांनाही लागू आहे.
वचावचा बोलणंही अनेकदा गरजेचंच असतं. पण ईझम्सच्या बाबतीत काही वेळा अनावश्यक वाटतं. त्या बोलण्यामुळे भुमिकेला वजन येत नाही. मुळातल्या भुमिकेत आणि ती मांडण्यात दम असेल तर बाकी नटवण्याची गरज उरत नाही मग, एवढंच.


Saturday, March 5, 2022

 गेल्या सहा तारखेला रविवार होता ही एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तशातली गोष्ट. आजही सहा तारीख आणि रविवार. काही घटना पचवण्यारिचवण्यासाठी - मुळात स्विकारण्यासाठी - एक उसंत मिळावी लागते, ती त्या रविवारानं समस्तांना दिली, हे खरोखर फार सुदैव होतं.

गेल्या सहा तारखेला जे काळोख दाटल्यासारखं झालं, तो उदासवाणा तवंग आज महिन्याभरानंतरही भोवती बराचसा शिल्लक आहे. रोजचं आयुष्य काय, सुरु रहातंच. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील हसूनी खिदळतील वगैरे व्हायलाही हवं. ही बातमी केव्हा तरी यायचीच होती. आधल्या दिवशी रात्रीपर्यंत मी मारे समजुतीच्या गप्पा मारत होते, पण आपण गाफील आहोत आणि मनाच्या अशा तयाऱ्या बियाऱ्या काही होत नसतात हे प्रत्यक्ष तो क्षण उगवल्याशिवाय उमगत नाही. एखाद्या माणसाला हयातीत कधीच न भेटताही ते माणूस तुमच्यात श्वासासारखं गच्च मुरून असतं आणि आसमंतात कुठेतरी ते माणूस तुमच्याबरोबरच श्वास घेतंय, हा केवळ दिलासाही अनमोल असतो. तो दिलासा अदृश्य झाला. एकाच वेळी खूप खाजगी गोष्ट जेव्हा अफाट सार्वजनिकही असते, तेव्हा गुदमरवणारा गोंधळ उडतो असा एक विलक्षण अनुभव आला. खात्रीनं माझ्यासारखाच अगणितांचा असा गोंधळ उडाला असणार.
माझ्या घरात सुहृदांच्या ह्या चौकोनातला एक जिवंत आणि रंगीत कोन शिल्लक होता. हा चौकोन माझ्यापुरता शाश्वत आहे, ती काळजी नाही. एवढी गदगद पुन्हा होण्याचं मात्र आता कारण उरलं नाही.


 गुळाचा सांजा आणि दहीपोहे.



Friday, March 4, 2022

 घराबाहेरच्या ओट्याचं सुशोभन.

महाद्वार रोड, कुंभार गल्ली, तिसरं घर.