नवरात्रीच्या रंगांवरची मतमतांतरं बाजूला सरकवून बघितलं तर भवताल सुखद दिसतो. सजलेला, फेस्टीव्ह. प्रत्येकीनं रोजच्या रटाळ रहाटगाडग्यातून जमेल तसा वेळ काढून मिळवलेली खुशी. ती हवेत पसरते आणि मनाला बरं वाटतं. विरोध करणाऱ्यांनासुद्धा विरोधासाठी चांगलं निमित्त मिळाल्यामुळं बरंच वाटत असेल. एकुणात विन-विन.
रीळमधली विद्या बालन बघून असंच प्रसन्न वाटलं. साड्यांची हौस तर तिला आहेच, आणि भारतीय तोंडवळा आणि ठसठशीत बांध्यानं त्या अगदी शोभूनही दिसतात तिला. बघा तरी.
साड्या इतक्या सुरेख कॅरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, बहिणी, भाच्या आठवल्या. मला नवरात्रभर फोटो पाठवा गं सगळ्या जणींनी
No comments:
Post a Comment