म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, March 7, 2014

महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…

मैत्रिणींनो,
तुम्हा सगळ्यांना उद्याच्या महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…
अनायासे वीकेंड आलाय, थोडा वेळ स्वत:साठी काढा, स्वत:ला आवडणारी एक तरी गोष्ट करा, ज्यात आपण छान दिसतो ते माहित असलेला आवडता ड्रेस घाला, स्वत:ला आवडणारा पदार्थ बनवा किंवा बाहेर जाउन खा…आवडते पुस्तक निदान ५-१० मिनिटे तरी वाचा… आवडणारा सिनेमा पहा, आवडत्या मैत्रिणीसोबत पोटभर गप्पा मारा, मनसोक्त हसा, आनंदी रहा…
हे सगळं रोजही करू शकतो आपण, पण आपल्यासाठीचा दिवस आणि शनिवार रोज येत नाही ना!!!

1 comment:

  1. सई तुझी ही पोस्ट मी फारच मनावर घेतली, संध्याकाळी सोसायटीच्या महिलादिनाच्या प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले, माझा आवडता ड्रेस जीन्स आणि top घातला. आवर्जून सगळ्यांना सांगितले, माझ्या एका मैत्रिणीने आज आवडता ड्रेस घाला सांगितले आहे, म्हणून हा ड्रेस(तो मला सूट होतो का नाही हा भाग वेगळा).

    ReplyDelete