म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, July 4, 2018

प्रणाम ताई _/\_ तुमच्यासारख्या तुम्हीच.

त्या जसं बोलतात, स्वत:ही कायम तशाच असतात, हे विशेष कौतुकाचं वाटतं. केव्हाही पहा, हसरा चेहरा, नीटनेटकी जिथल्या तिथे नेसलेली साडी आणि नुकतंच घरी वॉशिंग मशीन लावून साडी बदलून स्टेजवर येऊन गायला बसल्या असाव्यात इतकं घरगुती उबदार रुप. कधीही भरजरी किंवा खास कार्यक्रमासाठीच्या उठावदार साड्या नाहीत, अवघड टप्पे गातानाही चेह-याचे विक्षेप नाहीत, किचकट आलापी करतानाही भारंभार हातवारे नाहीत की मधेमधेच मॉनिटर अॅडजस्ट करा न् व्हॉल्युम कमी-जास्त कराच्या सूचना नाहीत. कशाकशाचं अवडंबर नाही. शांतपणे येतात, सहजपणे गातात, सभा शब्दश: जिंकतात आणि तितक्याच शांतपणे उठून जातात. हल्ली मांडी घालून फार वेळ बसवत नाही म्हणून केव्हा केव्हा पाय खाली सोडून बसतात, तेवढाच काय तो बदल. पण बाकी सगळं म्हणजे मूर्तिमंत सात्विकता आणि साधेपणा. पुलं गणगोतात हिराबाईंबद्दल म्हणतात त्यातलं बरंचसंच मालिनीताईंनाही लागू होतं.

No comments:

Post a Comment