म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, March 25, 2019

होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडीगोडी
रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी

रंगपंचमी आणि होळीची मराठी/हिंदी गाणी अनेक आहेत, पण त्या सगळ्यात हे पहिल्या पाचात. हिट्ट! अतिशय आवडतं गाणं. आता निव्वळ आकाशवाणीपुरत्या उरलेल्या शेकडो गाण्यांपैकी हेसुद्धा एक. बघायची उत्सुकता होती, पण उपलब्ध दिसत नाहीये. दादा कोंडके शिक्का असलेली गाणी काही अपवाद आणि पुढे उतरत्या भाजणीतले चित्रपट वगळता अत्यंत श्रवणीय असतात. खूप आवडतात. कधी कधी लूपवर टाकून ऐकत चालताना गाण्यातल्या कन्व्हिंसिंग शाब्दिक करामती, गाणा-यांकडून गाऊन घेतलेले ठसके, ओठावर हसू आणतात. ठसठशीत मराठी छापाच्या चाली, डोलवणारे ठेके मन अगदी प्रसन्न करून टाकतात.

No comments:

Post a Comment