खाद्यमहोत्सव भरवण्याचे आणि त्यांची प्रदर्शनं मांडण्याचे हे दिवस नाहीत. बाहेर मिळतंय आणि परवडतंय, म्हणून आणत रहाणं, त्यानिमित्ताने बाहेर पडणं योग्य नाही. आहे ते सर्वांनी पुरवून वापरणं गरजेचं आहे. रोज पोटभरीचं आणि हवं ते खाऊ शकतो आहोत, ह्याबद्दल कृतज्ञता असू दे. अगदी हळहळ नको, पण जेवता-खाताना क्षणभरासाठी ज्यांना अनेक कारणांनी आज ददात आहे, त्यांना आणि प्रत्येकाला किमान दोन वेळचं अन्न रोज मिळो ही सदिच्छा ठेवणं, सध्या एवढं घरीच राहून करू शकतो आपण.
अनेकांना अनफॉलो केलं जातंय ह्या दिवसांमध्ये. निदान काही बाबतीत परिस्थितीचं थोडं गांभीर्य असायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment