म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, May 15, 2021

 सह्याद्रीच्या एखाद्या कड्यावर बसलेलो असताना अनुभवायला मिळणारं खालच्या द-याखो-यांमधून घुमणारं जोरदार वारं काल सकाळपासून घरबसल्या ऐकायला मिळतंय. खिडक्या पूर्ण उघडल्या तर कड्यावर उभे राहून चालताना लडखडतो तसं होईल इतका जोर आहे वा-याला. पाऊस सकाळपर्यंत आपला उगीच येऊन जाऊन होता, पाणी कमी आणि तुषार जास्त असा. दुपारपासून मात्र पाऊसही चांगलाच लागलाय. ढगाचा अंधार, सुखद गारवा, रविवार आणि कडकडीत टाळेबंदी असा मुरगळून पडण्याला साजेसा माहौल आहे. काश!

No comments:

Post a Comment