ढगाळलेल्या रविवारी सकाळी शाल ओढून आवडत्या पुस्तकात बुडी मारून इटींग स्नॅक्स अॅंड माईंडींग युवर ओन बिझनेस इज प्राईसलेस वगैरे.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Saturday, June 25, 2022
Chaitanya Dixit Omkar Diwan
पाच वर्षांपूर्वी 'सोस तू माझ्या जीवा रे'निमित्तानं दीक्षितांनी आमच्यामध्ये आणलेलं चैतन्य. दीक्षितांच्या अॅपिअरन्सवर जाऊ नये कुणी. स्वतः स्वस्थ न बसणे, इतरांना बसू न देणे, अवघड चाली बांधणे आणि ठरवलेली गोष्ट गोड बोलून डोक्यावर बसून करून घेणे आदी त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी काही आहेत.
ओंकार, चैतन्य आणि आमच्यात वावरणारे बाकीबाब बोरकर. परवानगीच्या रितसर सोपस्कारांदरम्यान भेटू शकलो त्या बोरकरांच्या सुकन्या पद्माताई वज्रम. ते सगळे दिवस आणि कविता म्हणजे चैतन्यनं आम्हां सगळ्यांना सप्रेम भेट दिलेली देखणी आठवण आहे.
Saturday, June 11, 2022
रोज ऑफिसातून बाहेर पडल्यावर वाटेत बालगंधर्वच्या आवारातल्या फलकावरचे अपडेट वाचून रस्त्याला लागत होते, त्यादिवशी गेटमधूनच फलकावरचा हार बघितला आणि कंबर खचली. २००० सालची ती संध्याकाळ वाईट होती. तुमचं दर्शन तर दुसऱ्या दिवशीही मिळालं नाही, पण बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कोपऱ्यावर चारपाच तास उभी राहून भोवतीनं वाढणारी गर्दी आणि समोर होत राहिलेली बडी वर्दळ हमसून रडत बघत राहिले. आज ते दृश्य नुसतं आठवतानाही डोळे डबडबतात. खरं म्हणजे हे लिहिण्याचं काहीही प्रयोजन नाही, पण तशी वेदना परवाच्या फेब्रुवारीत पुनश्च अनुभवली. हे व्यक्त करणंही आता थांबवलं पाहिजे.
Subscribe to:
Comments (Atom)