आज सकाळी पेपर उघडल्यावर स्पर्धा परिक्षांचे निकाल आणि झळकलेली नावं वाचताना, तेजस्वी चेहरे पहाताना खुप प्रसन्न वाटलं. सारख्या सारख्याच अशा परिक्षा व्हाव्यात, रोज रोजच हे असे निकाल जाहीर व्हावेत आणि रोज ह्या अशाच बातम्या याव्यात पहिल्या पानावर असं प्रकर्षानं वाटलं. नंतर मग थेट शेवटचंच पान असावं, खेळ आणि खेळाडूंच्या कामगि-यांचं. मधलंअधलं काही असू नये. असलं तरी छापलंच जाऊ नये आणि मुळीच नजरेला पडू नये!
योगेश, टीना, अन्सार आणि सर्वच यशवंतांचं, त्यांच्या पालकांचं, मन:पुर्वक अभिनंदन. उज्वल आणि खंबीर वाटचालीसाठी सर्व उत्तम शुभेच्छा. तुमच्यासारखेच तारे जास्तीत जास्त दिसत राहोत ही सदिच्छा.
No comments:
Post a Comment