म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, October 27, 2018

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

१. जात बदलता येते का? असल्यास त्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे? त्यासाठी काही पात्रता निकष असतात का?
२. माणूस ही जात शासकीय जातयादीत नमूद नाही. ती लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत?
३. माणूस ही जात लावण्याते संभाव्य परिणाम कोणते असू शकतात? विधायक आणि अविधायक, व्यक्तीगत आणि सामाजिक, दोन्ही किंवा आणखी काही
४. शासकीय माळेतल्या संबंधित अधिका-यांना फारशी माहिती नाही, तर ह्यासंदर्भातील नक्की पक्की माहिती कोणते शासकीय खाते आणि तेथील कोणत्या पदावरचे अधिकारी देऊ शकतील?
५. या मुद्द्यांसंदर्भात कोणतीही योग्य व नक्की माहिती मिळू शकली नाही, तर ती मिळवण्यासाठी कुठे चौकशी करता येऊ शकेल?
६. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे अशा प्रकारच्या नवनिर्माणासाठी / बदलांसाठी आवेदन देता येऊ शकते का?

No comments:

Post a Comment