म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, November 12, 2018

मिश्रधान्य धिरडी / दक्षिणेत ह्याला अडाई डोसा म्हणतात हे आत्ताच समजले.

सगळ्या किंवा जितक्या उपलब्ध असतील तितक्या डाळी (मी सगळ्या घेते - मूग, तूर, मसूर, उडीद, हरभरा), तांदुळ, साबुदाणा आणि चमचाभर मेथीदाणे, हे सगळं रात्रभर भिजवून घ्यावं. सगळ्या डाळी समप्रमाणात घेऊन सगळी मिळून जितकी होईल त्याच्या निमपट तांदुळ घ्यावेत. साधारण प्रत्येकी पाव वाटी डाळी, अर्धी वाटी तांदुळ आणि अर्धी वाटी साबुदाणा ह्या प्रमाणात बारा ते पंधरा धिरडी होतात. लसूण, हिरवी मिरची, आवडत असल्यास एखादा टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, हिंग, ओवा घालून हे सगळं मिक्सरवर वाटावं. मिश्रण आंबवायचं नाहीये. तव्यावर धिरडं हलक्या हातानं पसरता येईल इतकं सरबरीत मिश्रण हवं. किंचित तेलाचा हात फिरवून बिडाचा तवा किंवा पॅन तापवून त्यावर मिश्रण पसरून झाकण ठेवावं. आच मध्यम असावी. डाळी फक्त भिजवलेल्या असल्यामुळे नीट वाफवल्या जायला हव्यात, नीट शिजल्या गेल्या नाहीत तर पोटात गुबारा धरू शकतो. ही थेट प्रथिनं असल्यामुळे पचायला जड होऊ शकतात. हिंग आणि ओव्याचं प्रयोजन त्यासाठीच. धिरड्याची एक बाजू झाली की परतून दुसरी बाजूही शेकून घ्यावी. दोन्ही बाजू नीट परतल्या जाणं आवश्यक आहे. वाढताना लसूण-नारळाची हिरवी चटणी किंवा लसणाचं तिखट, सॉस कशाहीबरोबर छान लागतात. घरचं लोणी असेल तर नुसतीही चवदार लागतात.

हा क्लिष्ट नसला तरी थोडा वेळखाऊ प्रकार आहे त्यामुळे ब्रंचला सोयीचा. पोटभरीचं, शिवाय पूर्णान्न असं वन डीश मील. एकावेळी दोन तवे ठेवले तर पटापट होतात.

काहीवेळा तांदुळ नवे असतील तर दाण्यांना पुरेसा चिकटपणा नसतो, त्यासाठी मी साबुदाणा वापरते. साबुदाण्याला कणकेचाही पर्याय आहे. भिजवलेल्या साबुदाण्यामुळे मिश्रण बांधीव होतं, धिरडीही दडदडीत न होता मऊसर होतात. मिश्रणात पाण्याऐवजी ताक वापरल्यास आणखी उत्तम. टोमॅटोमुळे किंचित आंबटपणाबरोबरच मिश्रणाला डाळीच्या पिवळसर, कोथिंबिर-मिरचीच्या हिरव्या रंगात मधेमधे लाल रंगही येतो, तो छान दिसतो. शिवाय बाकी मोडाची कडधान्यं, पालेभाज्या, किसलेला कोबी/गाजर, बारीक चिरलेली ढबू मिरची, कांदा, अशा ढकलाढकलीच्या आणि पौष्टिकता वाढवण्याच्या अनेक सोयी ह्यात आहेत. दोन तीन धिरड्यांत गार व्हायला होतं. (सुमार फोटोजबद्दल क्षमस्व!)

Mixed Grains Pan Cakes / Adai Dosa

All kinds of available dals (I generally take all- moong, tur, masur, udad, chana), rice, sabudana, half spoonful of fenugreek seeds - all overnight soaked. No specific proportion. Dals together should be more than rice. Garlic cloves, green chillies, handful of coriander leaves, pinch of asafoetida, little ajwain, a tomato and salt to taste. Grind everything together to get a batter with pouring consistency. Do nit ferment the batter. Oil brush the pan and heat on medium flame, pour the batter to a medium size pan cake and steam cook for 2-3 minutes. The pancakes should get properly cooked and roasted from both the sides, since dals are only soaked and not processed. Here it is a direct protin intake, it can become heavy to digest. Once done, serve with coconut green or garlic dry chutney or tomato sauce. A dollop of home made white butter will add more taste.

Sabudana can help the batter to become sticky and pan cakes softer. Even wheat flour is a good option for that. Also for grinding the batter, buttermilk can be best instead of water. Sprouts, green vegetables, grated cabbage or carrot, simla mirchi, onion etc. can be added as per choice. Numorous possibilities of taste and nutrition together.

This should ideally be a brunch affair as though simple, it is a little time consuming dish. Keeping two pans at a time can save the time. However truly fulfilling and nutricious one dish meal by all means. (Excuse me for not so good clicks :-( )

No comments:

Post a Comment