म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, April 13, 2019

'शुध्द'लेखन

प्रमाणभाषेसंदर्भात आग्रही असणं आणि त्यातल्या गंमतीजमतींचे विनोद पुण्याठाण्यामुंबईत नवीन नाहीत. ती जीवनावश्यक बाब असते अनेकांसाठी. ओसीडीचाच प्रकार. त्या अनुषंगानं येणा-या अनंत मुद्द्यांचा काहीच विचार नसतो. त्यामुळे लेख पटला.

कोल्हापुरात आल्यापासून नीलची भाषा अमुलाग्र बदलली आहे. त्याच्या भोवतालच्या परिसराचं, त्याच्या मित्रांचं, शेजारपाजाराचं, त्याच्या मानसिक स्थैर्याचं आणि कोल्हापूर प्रेमाचं प्रतिबिंब त्याच्या बोलण्यात स्पष्ट उमटलेलं दिसतंय. नव्या वातावरणात झपाट्यानं रुळताना मुलं आपोआपच कशी स्वत:त नव्या नव्या गोष्टी घेत जातात ते बघणं इंटरेस्टींग आहे. त्याला ओळखणा-या आणि तो एक बरा वाचक आहे हे माहित असणा-यांना त्याचं बोलणं ऐकून धक्का बसलेला चटकन कळतो. ते गंमतीशीर असतं. रोजच्या वापरासाठी आणि संवादासाठी भाषेचा जो पोत तुम्हाला सोयीस्कर वाटतो, आनंद देतो, ती तुमची भाषा, असं वाटतं. गवसांचं हे सदर खूप छान चालू आहे.

#सुत्तड़ गुत्तड़ #राजन गवस

No comments:

Post a Comment