थँक्स Jayant Vidwans, सैगल फार आवडतो. सकाळी पावणेआठापर्यंत धुमशान करत घुमत आई केरवारे, स्वत:ची आणि आमच्या आंघोळी, पाणी भरणे, धुणी, नाश्ते, भांडी आटोपून निवांत चहाचा घोट घेत घरातल्या लाकडी जिन्याच्या पहिल्या पायरीवर ह्या माणसाचं गाणं ऐकायला बसायची. बाबांची पूजा सुरू असली तरी रेडिओही चालू असेच.
सहसा आईवडिलांना प्रिय असणारे लोक मुलांना त्या वयात भावले नाहीत तरी कालांतराने आवडायला लागतात तोच प्रवास माझाही सैगलबाबतीत झालाय. अतिशय आवडतो आणि त्याला ऐकण्याचा रेडिओखेरीज इतर कोणताही सोर्स तेव्हा सहज उपलब्ध नसल्याने रोजची ती वेळ गाठण्यासाठी होणारी आईची तडफडही आता समजू शकते. नंतर रेकॉर्ड प्लेअर आल्यावर त्यांची एलपीही वारंवार वाजवायची ती.
पण सैगल म्हटलं की पुराने फिल्मों के गीत, पावणेआठ आठचा सुमार, घामेजलेली आई आणि तिच्या हातातला चहाचा कप हे डोक्यात घट्ट रुतलेलं चित्र आहे. 86 साली ती गेली त्यानंतर रेडिओ सिलोनचा तो सकाळचा कार्यक्रम घरात तिच्याइतक्या असोशीनं पुन्हा ऐकला गेला नाही. पुढे त्या कार्यक्रमाचं नाव, वेळ, सैगलचं ते शेवटाचं गाणं हे सगळंच बदलत गेलं, पण सैगल ऐकणं मात्र अजूनही सुरू आहे. आनंदी लहानपणाशी सैगल कनेक्शन थेट जोडलेलं आहे. पुनश्च शतश: धन्यवाद, तुमच्यामुळे नॉस्टॅल्जियात सुखद डुबक्या मारायला मिळाल्या :-)
No comments:
Post a Comment