म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, October 31, 2019

 निव्वळ सुमधुर. गत ऐकताना क्रमाने शिगेला पोहोचणारा आनंद अवर्णनीय आहे.

परफॉर्मन्सपूर्वीचं पं. रविशंकरांचं श्रोत्यांना आवाहन आणि जॉर्ज हरिसनांनी कलाकारांचा दिलेला जितक्यास तितका परिचयही ऐकण्याजोगा आहे. उगीच अनावश्यक शब्दांचा पसारा नाही. बांग्लादेशसंबंधित चित्रफिती मात्र अंगावर येणाऱ्या आहेत.
काल अनुष्का शंकरचीही एक सुरेख क्लिप ऐकण्यात आली. पंडितजींची नोडू सतार कायमची ब्रिटिश म्युझियममध्ये संग्रहासाठी देण्यापूर्वी भावूक होऊन तिनं वडिलांच्या सतारीवर थोडा हात फिरवून घेतला, ती क्लिप. इतके अवघड वारसे यशस्वीरीत्या पुढे चालवणा-या मुलांचं अतोनात कौतुक वाटतं.
Pandit Ravi Shankar and Ustad Ali Akbar Khan Duet Performance Tabla- Ustad Alla Rakhha Khan Tanpura- Kamala Chakravart

No comments:

Post a Comment