म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, January 30, 2020

 विद्याताई, तुमच्या रुपानं एक मस्त माणूस हरवलं. अक्षरस्पर्शच्या दारात बुचाची फुलं एकत्र वेचताना, प्रभात रस्त्यावरच्या तुमच्या सायंकालीन फेरफटक्यात, असे वेगवेगळ्या निमित्तांनी झालेले तुमच्याबरोबरचे संवाद कायम लक्षात रहातील. ऑफिस प्रभात रस्त्यावर असण्याच्या अगणित लाभांमधला हाही एक होता. तुमचं संयत लेखन आवडतंच, पण अलिकडचा 'अवघे पाऊणशे वयमान' मालिकेतला तुमचा लेखही विशेष आवडला होता. पन्नासाव्या वर्षी वानप्रस्थाश्रम ही कल्पना अत्यंत भावली आणि तुम्ही दुरूनच का होईना, पण तसं जगताना प्रत्यक्ष दिसतही होतात. इच्छामरणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याबद्दलही तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. बाकी तुमच्या कार्यासंबंधी बोलण्याइतकी पात्रता नाही. एकच म्हणेन, तुमच्यासारखं जगता यायला हवं. #विद्याबाळ

Tuesday, January 28, 2020

 भावना सोमय्यांना ऐकणं हीसुद्धा मेजवानी आहे. जी मासिक सुरू झालं होतं तेव्हापासून बरीच वर्षं सलग आणून वाचलेलं आहे. ते विसरूनही गेले आता मी. पण बाईंच्या दिसण्यात काहीही फरक नाही. केशरचना, साड्यांचे प्रकार, तब्येतही जशीच्या तशी. पेज थ्री प्रकाराची ओळख जीमधून झाली, पण सनसनाटी नसायची. त्या वयात मला चमचमत्या दुनियेबद्दल जितकं कुतुहल होतं, तेवढं शमायचं. जीनं कव्हर केलेलं सुप्रिया सुळेंचं लग्न ठळक आठवतंय.

बिग एफ एम ची ट्यून आवडते, विशेषत: सोनू निगमचा तुकडा. सुहाना सफर वुईथ अन्नू कपूर आवडतंच. बाकीचेही कार्यक्रम किंवा आरजेंची बडबड इतर वाहिन्यांपेक्षा सुसह्य असते. आकाशवाणीशी तुलना नाहीच, पण बदल म्हणून बरं वाटतं ऐकायला.
पंगाचे अभिप्राय चांगले येतायत. आवर्जून चित्रपट न पहाणा-यांना कोणता बघावा, कोणता राहिला तरी चालेल, हे ठरवायला अशा अभिप्रायांची जरा मदत होते 🙂
https://www.facebook.com/bigfmindia/videos/189905939074552



Wednesday, January 22, 2020

 एकदा कुणाशी तरी दणकून चकमक झाली. तपशील अजिबातच आठवत नाहीत, पण घरी येऊन तिरमिरीत संकल्पांच्या यादीत फळ्यावर; काहीही होवो, कुणाशीही वाद घालायचे नाहीत, असं खरडलं. माझं लिहून झाल्या झाल्या नीलनं तत्परतेनं खाली लिहिलं, 'खास करून नीलशी'

🙈 आईशपथ, ते लिहिताना तो वट्ट डोक्यात नव्हता माझ्या! भयंकर ओशाळले होते मी. आज हस्ताक्षर दिनानिमित्त ते नेमकं आठवलं.

 #हस्ताक्षरदिन

#चंमतग


















Monday, January 13, 2020

 तांदूळ लसूण घावने आणि ओल्या लाल मिरचीचा ठेचा, सोबतीला सगळ्या लेकुरवाळ्या





Thursday, January 9, 2020

 पुस्तक मुखपृष्ठ दिंडी पुढे न्यायची राहिली होती, आज दुसरे पुस्तक.

नाश्त्याला सकाळी उफीट केलं आणि हमो आठवले. चिमणा हनु, अर्धवट वयाचा बाबल, विक्षिप्तशिरोमणी काका, आईची अंगावर येणारी आणि आपलीही झोप उडवणारी पराकोटीची दुर्दशा, झोळंब आणि सुर्ल्याचा परिसर, तो उघडावाघडा मांगर, ती चित्पावनी, पुढे पोह-यातलं मालवण, दोघा भावांची - खरंतर अख्ख्या कुटुंबाचीच मुलखाची ससेहोलपट आणि ह्या सगळ्या जंजाळात ब-याचदा भेटणारं ते उफीट. बालकांड, पोहरा वाचणं आणि नंतर अनंत संदर्भांनी ते पुन्हा पुन्हा आठवत मनात घोटाळत रहाणं सगळंच महात्रासदायक.

Saturday, January 4, 2020

 धन्यवाद Vishal कुलकर्णी, पुस्तक मुखपृष्ठ दिंडीत पुन्हा सामील करुन घेतल्याबद्दल.

पहिल्या दिवसाचं मुखपृष्ठ - आवडता ग्रंथराज 'दासबोध'. माझी प्रिय मैत्रिण रुपालीच्या बाबांनी खूप वर्षांपूर्वी मला सार्थ ज्ञानेश्वरी आणि दासबोध भेट दिले होते, त्यापैकी दासबोध जरा जास्त प्रिय आहे.
Rupali Khandalkar, सात दिवस सात मुखपृष्ठे शेअर करण्यासाठी तुला बोलावते आहे 😊