म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, January 30, 2020

 विद्याताई, तुमच्या रुपानं एक मस्त माणूस हरवलं. अक्षरस्पर्शच्या दारात बुचाची फुलं एकत्र वेचताना, प्रभात रस्त्यावरच्या तुमच्या सायंकालीन फेरफटक्यात, असे वेगवेगळ्या निमित्तांनी झालेले तुमच्याबरोबरचे संवाद कायम लक्षात रहातील. ऑफिस प्रभात रस्त्यावर असण्याच्या अगणित लाभांमधला हाही एक होता. तुमचं संयत लेखन आवडतंच, पण अलिकडचा 'अवघे पाऊणशे वयमान' मालिकेतला तुमचा लेखही विशेष आवडला होता. पन्नासाव्या वर्षी वानप्रस्थाश्रम ही कल्पना अत्यंत भावली आणि तुम्ही दुरूनच का होईना, पण तसं जगताना प्रत्यक्ष दिसतही होतात. इच्छामरणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याबद्दलही तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. बाकी तुमच्या कार्यासंबंधी बोलण्याइतकी पात्रता नाही. एकच म्हणेन, तुमच्यासारखं जगता यायला हवं. #विद्याबाळ

No comments:

Post a Comment