भावना सोमय्यांना ऐकणं हीसुद्धा मेजवानी आहे. जी मासिक सुरू झालं होतं तेव्हापासून बरीच वर्षं सलग आणून वाचलेलं आहे. ते विसरूनही गेले आता मी. पण बाईंच्या दिसण्यात काहीही फरक नाही. केशरचना, साड्यांचे प्रकार, तब्येतही जशीच्या तशी. पेज थ्री प्रकाराची ओळख जीमधून झाली, पण सनसनाटी नसायची. त्या वयात मला चमचमत्या दुनियेबद्दल जितकं कुतुहल होतं, तेवढं शमायचं. जीनं कव्हर केलेलं सुप्रिया सुळेंचं लग्न ठळक आठवतंय.
बिग एफ एम ची ट्यून आवडते, विशेषत: सोनू निगमचा तुकडा. सुहाना सफर वुईथ अन्नू कपूर आवडतंच. बाकीचेही कार्यक्रम किंवा आरजेंची बडबड इतर वाहिन्यांपेक्षा सुसह्य असते. आकाशवाणीशी तुलना नाहीच, पण बदल म्हणून बरं वाटतं ऐकायला.
पंगाचे अभिप्राय चांगले येतायत. आवर्जून चित्रपट न पहाणा-यांना कोणता बघावा, कोणता राहिला तरी चालेल, हे ठरवायला अशा अभिप्रायांची जरा मदत होते
https://www.facebook.com/bigfmindia/videos/189905939074552
No comments:
Post a Comment