म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, October 16, 2020

 यंदा कडाकण्या घरीच आणि मनसोक्त खाता येणार

💃
कडाकण्या मला आणि बाबांना आवडतात. आमच्याकडे त्या करण्याची पद्धत नाही. आज अचानक बाजारात हे दिसलं आणि उचललंच. गंमत म्हणजे घरी करण्याचं कधी सुचलंही नाही आजवर. कारण काही पदार्थ कायम घरपोचच मिळत आलेले असतात 😊
मोत्यांचा गजरा आणि फॅन्सी मंगळसुत्र आमची डॉमेस्टीक इंजिनिअर मंगलसाठी आहे. (संज्ञा क्रेडीट टू सुला व-हाडकर) तेही असंच फारच आवडलं. तिला शोभेल छानपैकी, हौसेनं घालेल अगदी. तर बाजारातून आलेल्या पिशव्या उपसत जे जिथे जागा मिळेल तिथे ते ठेवलं की असं कशाच्याही शेजारी कुणीही असू शकत असतं😄
लाडकी फुलं ह्या मौसमात आज पहिल्यांदाच थोडीफार तरी वेचता आली. मग त्यांचं कवतिक अंमळ जास्तच ❤️💙🧡💚💜💛
Rupali, तुझी फुलदाणी चपखल आहे बघ ह्या लाडक्यांसाठी🙂
ता.क. - मैदा-रव्याच्या गोड, कडक पांढ-या पु-या असतात. कुणाकुणाकडे बेसनाच्याही करतात. त्यांचा साचा मिळतो. त्यांना लाटताना पेनच्या टोपणानं मधे भोक पाडून, साचा नसेल तर कडेनं कातणीनं नक्षीदार कातून तळतात आणि नवरात्रींच्या माळांमध्ये त्या रोज एकेक ओवतात🙂 माळेत मावाव्यात म्हणून फुगू देत नाहीत, जास्त टिकाव्यात म्हणून खरपूस कडक तळतात. कडक म्हणून पण कडाकण्या. तुकडा मोडताना खरंच कडाक आवाज होतो 🙂इकडे घराघरात मोठमोठाले डबे भरून करतात आणि दिवाळी फराळासारखी देवाण-घेवाणही करतात. आम्ही आमच्या शेजारी-पाजारी त्या लाटायलाही जायचो. ही माझी थोडी ऐकीव, थोडी अनुभवलेली माहिती आहे, ज्यांना जास्त माहिती आहे, त्यांनी कृपया भर घाला. त्या करून ओवण्यामागे कारण काय हेही जाणून घ्यायला आवडेल.


No comments:

Post a Comment