मी काही अभ्यासक नाही, पण मुळात मिसळ म्हणजे मिसळून केलेला एक सोयीचा पदार्थ. तो अस्मितेचा मुद्दा होण्यासाठी त्याची ठराविक अशी काही प्रमाण पाककृती नाही. कोणत्याही गावातल्या प्रत्येकाने आपापले फॉर्म्युले तयार करून त्या लोकप्रिय केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेडेगावात बाजाराच्या दिवशी जाऊन तिथली मिसळ चाखली तर ती भन्नाट चविष्ट असून, या भल्या भल्या दावेदार मिसळी तिच्या तुलनेत फिक्या पडतील हे कुणाच्याही लक्षात येईल. मूळ मिसळीत काही सबस्टॅंशिअल मुद्देमाल नसल्यामुळे पाव किंवा पेटीपाव पोटभरीसाठी खाल्ला जातो, असा माझा अंदाज आहे, जो चुकीचा असू शकतो. ज्याप्रमाणे आमटी भाजीबरोबर भाकरी किंवा पोळी आपापल्या आवडीनुसार उपलब्धतेनुसार खातात, तोच प्रकार. मूळ मिसळ बेचव असेल तर पाव किंवा पेटीपावानं फरक पडत नाही.
एका ग्रुपवर मिसळीवर चाललेल्या चर्चेत पहिल्यांदाच मांडलेलं हे माझं अनपॉलिश्ड मत आहे. मिसळीवर (आयुष्यावरच केला नाहीये तिथं मिसळीची काय कथा!) कधी एवढा विचारच केला नसल्यामुळे अशा चर्चा टेबल टेनिसची मॅच बघितल्यासारख्या नुसत्याच इकडून तिकडे माना टोलवत वाचल्या जातात.
Samidha Sadanand Kelkar पावानिमित्तानं तू आठवलीस. पाव हा मिसळीहून महत्त्वाचा असू शकतो, हे कोणे एके काळी तुझ्यामुळे कळलं होतं आणि हतबुद्ध झालेली मी लख्ख आठवतेय.
No comments:
Post a Comment