म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, April 23, 2016

आपली आवड - 2

कालच हनुमान जयंती झालीये, त्यानिमित्ताने ब-याच जणांनी आठवून शोधून हे गाणं ऐकलं असेल. नाहीतर तसं अलिकडे सहसा हे गाणं कानावर पडत नाही. मात्र आपली आवडमधे तेव्हा मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची मागणी असणारं, म्हणुन वरचेवर लागणारं भक्तीगीत होतं हे. सकाळी प्रभातवंदनलाही नेहमी वाजवलं जायचं.

दादांच्या बहुतेक सगळ्याच गाण्यांना तशीही कायमच उत्स्फुर्त मागणी आणि दाद असायची, आजही असतेच. त्यात हे गाणं तर एकदम स्फूरण चढवणारं लिहीलंय, मारूतीच्या आयुष्यातल्या सगळ्या रंजक घटना किती मस्तपैकी काव्यमय गुंफल्यात. महेंद्र कपूरनीही इतकं समजून घेऊन, जीव लावून म्हणलंय की ऐकताना कोणत्याही थरातल्या श्रोत्याला एकदम अपिलच होतं. आज शेअर करायचं म्हणुन शोधलं तेव्हा पहिल्यांदाच ते मी बघितलं. काय उस्ताद माणूस होता हा! साध्यासुध्या गोष्टीतून त्यांनी लोकांची नस बरोबर पकडलीये.

गीत - अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान
गायक - महेंद्र कपूर

No comments:

Post a Comment