एक विनंती आहे.
गेल्या आठवड्याभरात मला व्हॉट्स अपवर 'पुणे' या विषयावर सातआठ वेळा हिणकस विनोदांची ढकलगाडी आली. इथे दोन तीन राजकीय पोस्ट्समधे टॅग केलं गेलं. कृपया मला असे विनोद पाठवू नयेत अथवा कोणत्याही धार्मिक, राजकीय पोस्टमधे टॅग करू नये. असे विनोद मला आवडत नाहीत, पटत नाहीत. मी स्वत: पुणेकर आहे. पुण्यावर माझं मनापासून प्रेम आहे. व्यक्तिश: मला पुण्याचा आणि पुणेकरांचा फार चांगला अनुभव आहे, त्याउप्पर मला हे शहर पोटापाण्याला घालतंय. मला पुण्याबद्दल अत्यंत आत्मियता आणि कृतज्ञता आहे.
माझी राजकीय आणि धार्मिक मते वैयक्तिक आहेत, त्याबद्दल मी कुणाशी वा कुणी माझ्याशी सहमत असावं हे आवश्यक नाही.
ज्या त्या वेळी जिथे तिथे हे सर्वांना सांगितलं आहे, पण पाठवणारे दर वेळी निराळे असतात म्हणुन इथेही सांगते. कृपया इतरांच्या मताचा आदर राखला जावा ही पुनश्च मनापासून विनंती.
No comments:
Post a Comment