म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, January 29, 2017

Sanjay Bhaskar Joshi, किराण्याच्या बिलांपेक्षा पुस्तक पेठेची बिलं जाडी होतायत. सांगितलेल्या पुस्तकांच्या चौपट आणली जातात. तुम्ही ट्राय करण्याची तसदी अजिबात घेऊ नये ही नम्र विनंती असे :D

Friday, January 27, 2017

एक कष्टाचं, मानाचं जगणं, प्रामाणिक गाणं आणि सर्व चांगल्यावाईट भावनांसकट माणसासारखं माणूस असणं ह्या गोष्टी 'लता' हा विषय आला की त्वेषानं नाकारतात लोक. जणू काही व्यक्तिश: त्यांच्यावरच अन्याय केलेला असतो तिनं. लता आणि सुनिताबाई ह्या दोन नावांबद्दल एक आडमुठा कडवटपणा दिसतो लोकांच्या मनात. पण माणसानं संपूर्ण गुणी असावं ही अपेक्षा तावातावानं करताना त्यांच्यातल्या गुणांचं भरभरून कौतुक करायला सोयिस्कर विसरतात. पण ते त्यांनी वागलेलं चालतं, लता किंवा सुनिताबाईंनी तसं वागायचं नसतं.

मेहनत लता आणि आशा दोघींनीही जीव तोडून केलीये. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा सृष्टीचा नियम आहे, लता अर्थातच फिट होती. तिनं कधीही कसले गळे काढले नाहीत, स्वत:बरोबरच इतरांच्याही कष्टांचं योग्य मोल व्हावं म्हणून प्रसंगी मुलखाचा वाईटपणा घेऊन पदर खोचून उभी राहिली, कर्तबगारीनं भरभरून जगली. गुलजार म्हणतात तसं, चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्राँगनं ठेवलं, म्हणून मागच्यांचं महत्त्व कमी होत नाही, कुणीतरी एकच आधी उतरू शकणार होतं, तसंच लता-आशाचं आहे.

Tuesday, January 17, 2017

नय्यरसाब!

घरी एका कॅसेटमध्ये “रातोंको चोरी चोरी बोले मोरा कंगना”, “बेकसी हदसे जब गुजर जाये”, “मेरा प्यार वो ही के”, “मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं”, “गरीब जानके हमको न तुम भुला देना”, “पिया पिया पिया मोरा जिया पुकारे”, “सच बता तू मुझपे फिदा क्यु हुआ और कैसे हुआ”, “आंखों से जो उतरी है दिल में”, “मेरी जान तुमपे सदके एहसान इतना कर दो”, “हाथ आया है जबसे तेरा हाथ में”, “आज कोई प्यार से दिल की बातें कह गया”, अशी काही गाणी होती. दोन्हीकडच्या बाजू नेमक्या कोणत्या गाण्याच्या कोणत्या जागी अडकून बंद पडायच्या तेसुद्धा आठवतं आणि गंमत म्हणजे आज ती गाणी ऐकताना त्या जागा आल्या की आता ती अडकतील असं मजेशीर काहीतरी वाटतं आणि जाम हसू येतं. त्यातच हे “चांद जर्द जर्द है, रात सर्द सर्द है” गाणंसुद्धा होतं. टोटली गोड, मधुर कॅटेगरीतलं आणि गुंगी आणणारं. जलते है जिसके लियेचं आनंदी व्हर्जन वाटावं अशी सुरुवात. कडव्याला दिलेली वेगळी ट्रीटमेंट कॅची आहे. त्यात पडद्यावर देव-मधुबाला! काय नव्हेच!

ही गाणी कमी जास्त आवडती ठरवता येत नाहीत. कारण सगळीच एकाच वेगानं थेट हव्याहव्याशा काळात मागं नेतात. तिथे आई-बाबा असतातच, पण पार्श्वभूमीवर ही गाणी वाजतानाच एकीकडे काहीतरी घरगुती कामं असतात, आईचं ओरडणं आणि तिच्यावर उलट चिडणं असतं, केलेला किंवा न केलेला अभ्यास असतो, घरात खेळलेले खेळ असतात, घरात बाबांचे कुणीतरी मित्र किंवा आम्ही सगळे मिळून बाबांच्या कुणातरी मित्राच्या किंवा आईच्या कुणा मैत्रिणीच्या घरी असतो आणि ते सगळे मन लावून गाणी ऐकत माना डोलवत त्यावर काहीतरी बोलत असतात. जोरजोरात बोलत असले तरी ते एकमेकांच्या बाजूनंच बोलत असतात, एकमेकांना दुजोरे काय देतात, त्यांना त्या गाण्यांबद्दलचं सगळं तोंडपाठ काय असतं! लंप्यासारखी गत होते तंतोतंत. जादुई दुनियाच वाटायला लागते सगळी. एक जरी गाणं लागलं तरी हे असं सगळं होतं. ओपींचा वाढदिवस हे आपलं एक निमित्त.

नकळत्या वयात सुरू झालेला हा प्रवास व्हाया शुभ्र काही जीवघेणे अजूनही सुरू आहे आणि मोरावळ्यासारखा मुरत चाललाय. आशा प्रिय आहेच, पण राहून राहून प्रश्न पडतो, ह्या माणसानी तयार केली असती तर लताची गाणी कशी असती?

https://www.youtube.com/watch?v=0gz9tZUH82E

Monday, January 16, 2017

एक नम्र आठवण.

ज्या ज्या मंडळींनी जुलै महिन्यात झाडे लावली आहेत, त्यांनी कृपया आपापल्या आणि शक्य असल्यास इतरही रोपांना पाणी घालण्यास सुरूवात करावी.

Saturday, January 14, 2017

बोला अमृत बोला
शुभसमयाला गोड गोड गोड

https://www.youtube.com/watch?v=_4xOrvbteiQ&list=PLuPfUlDGRsk7NGPJ2I55Rk1y1yHoIZyaz

Tuesday, January 10, 2017

Happiness is when the weak points of you and your son start matching!

ट्टॉक! :-)

Friday, January 6, 2017

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
*************************************************************************

निवांत पोपट यांनी 24/07/2010 - 20:10 ह्यावेळी प्रकाशित केले.

अमिता बच्चन की लैला
अमिता बच्चन.माझ्या शेजारी बस्करावर बसलेल्या बालमित्रानं मला सागिंतलं “मी काल पिच्चर बघितला.त्यात अमिता बच्चन होता”.अमिता बच्चन? हे असलं विचित्र नाव मी पहिल्यांदाच ऎकलं होतं.तो पिच्चरचा हिरो होता म्हणे. हिरो म्हणजे काय तेच मला महित नव्हतं. असलंच तरी माझे हिरो वेगळे होते.सापनागांना खेळवणारे गारुडी,सायकलचं पायड्ल मारुन सुय्रा कात्र्यांना धार लावणारे लोक,दरवेशी हे माझ्या आकर्षणाचे केंद्र असायचे. स्वतःला आसूड मारत क्वचित दारावर येणारी कडक ल़क्ष्मी पण माझ्या खास आवडीची होती त्या वेळी. पण भिती वाटायची त्याची.शाळेत जाताना वाटेत कुंभाराचं एक घर लागायचं. त्याचा नंबर देवबाप्पानंतर लगेच.त्याला मी नेहमीच निरखायचो.त्याला चिखल तुडवताना पाह्ताना मला त्याला सामील व्हायचा, धैर्य नसलेला मोह व्हायचा.मग एखाद्या वेळी तो चाकाजवळ बसलेला दिसायचा.त्याची बायको त्याला कामात मदत करत असे. ती दोघं एकमेकांशी अजिबात न बोलता काम करत असत.त्यांच चाक फ़िरतं दिसलं की मी त्याच्याजवळ थॊडं अंतर राखुन ठिय्या मारायचो.अजिबात न बोलता. मौन हा आमच्यामधला अनुउच्चारित करार होता. अजिबात बोलायचं नाही.मग हातातलं तपकिरी लोणी तो त्या फ़िरत्या चाकावर ठेउन अतिशय स्थिर हात आणि नजेरेने तो वेगवेगळ्या वस्तू तयार करायचा.हाताची बोटं मातीच्या गोळ्यावर दाबत तो ते अद्भभूत आकार पैदा करायचा.पण त्याच्या कामाला माझी दृष्ट लागावी अशी माझी इच्छा असायची.कारण मनासारखं जमलं नाही तर मग तो मातीच्या त्या गोळ्याला फ़क्त आडवा तळवा लावायचा. अवकाशात कोलांट्या उड्या खाउन कोसळत असल्यासारखा तो मातीचा गोळा मग घसरत ,वितळत,विरघळत त्याच्या हातात काही क्षणात येउन विसावायचा. पण त्या काही क्षणात त्याचे लक्षावधी आकार तयार व्हायचे. हाय स्पीड कॅमेय्राने एका क्षणात लाख फ़ोटो काढल्यासारख्या त्या क्षणाच्या लाखॊ क्लीप्स माझ्या मनात मग दिवसभर तरळत राह्यच्या.(आत्ताचं म्हणाल तर मला डेमी मूर आणि पेट्रिक स्क्वाझी ह्यांचा घोस्ट मधील सीन आठवेल )
माझा दुसरा हिरो, त्याला अगदी सुपरस्टार पण म्हणता येईल असा म्हणजे,कल्हईवाला. भांड्यालाक……ल्है असा आवाज ऎकला की “आई कल्हईवाला आला” ही माझी आनंदाची आरोळी आख्या गल्लीला ऎकू जाईल एवढी मोठी असायची.नेहमी नाही पण कधीतरी आई त्याला बोलवायची.व्यवहार ठरल्यावर आई भांडी,पातेली बाहेर काढायची. माझं रुपांतर अचानक आज्ञाधारक मुलात व्हायचं. माझा आनंद त्या भांड्यात मावत नसल्याने मी आईला भांडी बाहेर आणायला मदत करायचो.भांडी बाहेर काढेपर्यंत कल्हईवाल्याने आपला जम अंगणात बसवलेला असायचा.त्याची जुन्या कपड्यांची ,चिंध्यांची गरज माझ्याकडून तातडीने पुर्ण केली जायची.त्याच्या धोकटीतुन बाहेर आलेला भाता आता कोळश्यांना फ़ुलवत असायचा. काही इंच अंतरावर मी त्याचा अदमास घेत एखादा कोळसा टाकायचे,भाता फ़िरवायचे चोरटे स्वातंत्र्य घ्यायचो. त्यानं बाजूला काढून ठेवलेल्या त्या जादुच्या कांडीकडे माझं लक्ष असायचंच. भांडं पुरेसं तापल्यावर कल्हईवाला ते भांडं चिंध्यांनी उचलून हातात घ्यायचा. मग त्यात ती नवसागर(हे नाव मला नंतर कळालं)नामक पावडर टाकून आत ती जादूची कांडी वेगाने फ़िरवायचा.माझे विस्फ़ारलेले डोळे झिणझिण्या धुराच्या पडद्याआड घडण्याय्रा जादूचा शोध घेत रहायचे….. अगदी शेवटचं भांडं संपेपर्यंत.
तर,माझ्या हिरोंमध्ये आणखी एकाची भर पडणार होती. अमिता बच्चन हे नाव मी पहिल्यांदाच ऎकलं होतं.हे कसलं विचित्र नाव?पण ह्या विचित्र नावाबाबतची माझी उत्सुकता दुसय्राच दिवशी शमवली गेली.माझ्या वडीलांनी मला जंजीर दाखवला.
काय होतं त्या पिक्चर मध्ये ते मला फ़ारसं आठवत नाही. मि तो परत कधी बघितला पण नाही. जंजीर म्हण्जे मला कपाटाआड दडलेला मुलगा आणि त्याच्या स्वप्नात येणारा पांढराशुभ्र घोडा एवढंच आठवतं.प्रकाश मेहेरानं पांढराशुभ्र घोडा हे कशाचं तरी प्रतीक म्हणुन वापरलं असावं.
मग जंजीर हे कशाचं प्रतीक होतं? जे कशाचं असेल त्याचं असेल. माझ्याबाबतीत तरी कशाचं आहे हे मला माहीत आहे. एरवी अनोळ्खी(?)संदर्भांना प्रतीकाचं नाव देउन मोकळा होतो मी.पण इथं तसं करुन चालणार नाही.जंजीर हा मी बघितलेला दुसरा चित्रपट.पहिला आराधना असेल. आता आठवत नाही. जंजीर ह्या शब्दाचा मला त्यावेळी अर्थसुध्दा माहीत नसेल.
जंजीर म्हण्जे काय? एका कडीची दुसर्या कडीशी गुंतागुंत. एक बंधन. कशाचं तरी कशाशी जखडलं जाणं…
उर्सुला अऍन्ड्रैसचा माउंट्न ऑफ़ कॅनीबाल गॉड……बघितलाय कोणी?त्यात माकडाला पिल्लाला विळखा घातलेल्या अजगराचा सीन आहे.शेवटी कॅमेरा झूम होत माकडाच्या डोळ्यावर विसावतॊ.पडद्यावर तो विळखा दिसत नाही.माकडाच्या डोळ्यात जाणवतो.जखडून जाणं म्हणजे काय ते कळतं.
तर मला काही कळायच्या आधीच एक विळखा माझ्याभोवती पड्ला होता.एका जंजीर’ने मला तिचा पहिला वेढा घातला होता.आता “जंजीर ह्या शब्दाचा मला त्यावेळी अर्थसुध्दा माहीत नव्हता” असं मी म्हणू शकतो? माहीत असो वा नसो.असला युक्तीवाद म्हण्जे तैमूरलंगाचा बेशरम वंशज!...जन्माआधीचा लंगडा. तुम्हाला कळायच्या आधी तुमचं काम तमाम झालेलं असतं. तुम्हाला जंजीर म्हणजे काय ते माहीत नसलं तरी जंजीर ला माहीत असतं तिचं काम.

[मी मराठी]

Thursday, January 5, 2017

In your remembrance - 7
****************************************
Blue eyes blue - Eric Clapton
*******************************************************

I thought that you'd be loving me
I thought you were the one who'd stay forever
But now forever has come and gone
And I'm still here alone
Cause you were only playing
You were only playing with my heart
I was never waiting
I was never waiting for the tears to start

It was you who put the clouds around me
It was you who made the tears fall down
It was you who broke my heart in pieces
It was, it was you who made my blue eyes blue

Oh, I never should've trusted you

I thought that I'd be all you need
In your eyes I thought I saw my heaven
And now my heaven's gone away
And I'm out in the cold
Cause you had me believing
You had me believing in a lie
Guess I couldn't see it
Guess I couldn't see it 'til I saw "Good-bye"

It was you who put the clouds around me
It was you who made the tears fall down
It was you who broke my heart in pieces
It was, it was you who made my blue eyes blue

Oh, I never should've trusted you

Cause you were only playing,
You were only playing with my heart.
I was never waiting, I was never waiting for the tears to start.

It was you who put the clouds around me.
It was you who, it was you who put those clouds around me.
It was you who made the tears fall down.
Only you, who broke my heart in pieces.
It was you, it was you who made my blue eyes blue.

Oh, I never should've trusted you.

https://www.youtube.com/watch?v=HNOR36mPtbk
बोलत रहा, मोकळे होत रहा. रडा, चिडा, पण घुसमटू नका. तुम्ही व्यक्त केल्याशिवाय तुमच्या मनातल्या उलाढाली इतरांना समजणार नाहीत. मदत घ्या, ती मागायला लाजू नका.

Wednesday, January 4, 2017

In your remembrance - 6
*****************************************
Slip n slide away you go oh - Laura Allen
******************************************************************

Lai lai lai lai lai lai lai lai lai
I got up a little late this morning
Had some trouble getting into the swing

I'm feelin' like a helium balloon
And someone let go of the string

Oh, no, I'm up in the clouds
You better tell 'em I'm out for the day
Cuz there's no way down
Can't get my feet on the ground
I keep slippin' and sliding away

Oh oh oh oh
Slip and slide away I go oh
Slip and slide away I go oh
Slip and slide away I go into a dream
Now they say that dreams are just for fools
Well I betcha fools made up those rules
So never mind what they say
Just slip and slide away, cuz it's okay

So whenever you feel a little crazy
May be too many things on your mind
Just clear a little place for your dreams my friend
And leave your troubles behind

Oh oh oh oh
Slip and slide away you go oh
Slip and slide away I go oh
Slip and slide away we go into a dream
Now they say that dreams are just for fools
Well I betcha fools made up those rules
So never mind what they say
Just slip and slide away, and it's okay!

https://www.youtube.com/watch?v=isW2m6JX8jM

Tuesday, January 3, 2017

In your remembrance - 5
*******************************************
Blowing in the wind - Bob Dylan
*************************************************************

How many roads must a man walk down
Before you can call him a man?
How many seas must a white dove sail
Before she sleeps in the sand?
Yes, how many times must the cannon balls fly
Before they're forever banned?
The answer my friend is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind.

Yes, how many years can a mountain exist
Before it's washed to the sea?
Yes, how many years can some people exist
Before they're allowed to be free?
Yes, how many times can a man turn his head
Pretending he just doesn't see?
The answer my friend is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind.

Yes, how many times must a man look up
Before he can really see the sky?
Yes, how many ears must one man have
Before he can hear people cry?
Yes, how many deaths will it take till he knows
That too many people have died?
The answer my friend is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind.

https://www.youtube.com/watch?v=401HfGXkA3Y

Monday, January 2, 2017

In your remembrance - 4
****************************************
Music Music Music - Teresa Brewer
************************************************************

Music, music music
Put another nickel in
In the nickelodeon
All I want is loving you and
Music, music music
I'd do anything for you
Anything you'd want me to
All I want is kissing you and
Music, music music

Closer, my dear come closer
The nicest part of any melody
Is when you're dancing close to me

Put another nickel in
In the nickelodeon
All I want is loving you and
Music, music music

https://www.youtube.com/watch?v=HXYwP6PNYRA