कौतुक शिरोडकरनं #चार_दिवस_चार_कविता ह्या दिंडीत मला कवितांचा फारसा गंध नसतानाही सामिल करून घेतलंय, त्याबद्दल थोडं आश्चर्य आणि त्याचे आभारही.
पु. शि. रेगेंची 'पुष्कळा' आवडीची आहे. काही संस्मरणीय संदर्भही तिच्याशी जोडलेले आहेत. पण पाठ नाहीये किंवा चटकन पहाण्यासाठी हाताशीही नाहीये. जर काही राहून गेलं, चुकीचं लिहीलं असेल तर दुरुस्ती सुचवा.
पुष्कळ अंग तुझं,
पुष्कळ पुष्कळ मन,
पुष्कळातली पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे,
देताना पुष्-पुष्कळ ओठ,
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळच उर,
पुष्कळाच तू, पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी
No comments:
Post a Comment