लोकांची प्रचंड गैरसोय होते ही जाणीव आहे, तरीही परिवहन महामंडळाच्या संपाला पूर्ण सहानुभूती आहे. सणासुट्ट्यांच्या मौसमात ह्या सेवेवर काय लोड येतं ते ही सेवा वापरणारे आणि संपामुळे गैरसोय होणारेच जास्त चांगलं जाणतात.
मी खाजगी प्रवासी सेवा वापरत नाही. माझ्याकडे स्वत:चे वाहन नाही. अनेकदा रिझर्व्हेशन करणं शक्य होत नाही, तेव्हा ड्रायव्हर केबिनमधे इंजिनावर बसूनही प्रवास केला जातो. वाहकचालकांशी बोलणं होतं. विदारक परिस्थिती असते.
हा मुहुर्त गाठायला नको होता हे खरं, पण मग नेमका कोणता मुहुर्त गाठायला हवा होता? ना पगार वेळेवर, ना काहीच्या काही जादा सेवादिवसांचा मोबदला, ना हातात धडधाकट वाहनं, ना वेळेवर सुट्ट्या, ना पुरेशी नोकरभरती, ना योग्य सोयीसुविधा. एरवीही कुणी विचारत नाहीत, आता तर संपाची शिक्षा म्हणून तुरुंगवास आणि बडतर्फीचाही बडगा आहे.
इकडे आड तिकडे विहीर.
http://m.marathi.webdunia.com/article/marathi-business-news/maharashtra-st-strike-117101600001_1.html
No comments:
Post a Comment