कर्नाटकात असणारे आमचे समस्त नातेवाईक, ओळखीचे लोक, माझ्याकडे मदतीला येणारी कानडी ताई, हे सगळे व्यवस्थित मराठी बोलतात. भले आपल्याइतकं ओघवतं नसेल, पण तेवढं अपेक्षित नाहीच. कर्नाटक सहलीत अगदी होस्पेटपर्यंत तोडकंमोडकं का असेना, मराठी बोलणारे लोक भेटत गेले. ते तसे पार पुढेपर्यंत असतील खात्रीनं. पण ऐन सीमाभागात असूनही मला किंवा माझ्या भोवतालच्या बहुतेक मराठी भाषकांना दोन चार चुकार कानडी शब्द वा वाक्यं वगळता कानडीचा गंध नाही. महाराष्ट्रातल्या इतर सीमाभागातलं चित्र मला माहिती नाही. ह्याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. ह्या भागातलं हे चित्र पूर्वीच्या मुंबई इलाख्यामुळे असेल असं वाटतंय.
Saturday, February 27, 2021
Saturday, February 13, 2021
World Radio Day today and I am an avid radio listener. Friend of all for pretty 110 years.
किती प्रचंड टीका, मत्सर, द्वेष सहन केलाय ह्या स्त्रीनं. केवढी मानसिक ताकद वापरत आली असेल ती आजवर. गाणं, कर्तृत्व, स्वर्गीय देणगी, प्रतिभा वगैरे बाजूला ठेवून माणूस म्हणून तिच्याकडे बघितल्यावर प्रत्येक वेळी मी अचंबित झाले आहे आणि तो अचंबा वाटतच रहाणार आहे मला. दोन्ही खांद्यांवरचा पदर सावरणं आणि मोकळं हसू ह्या दोन गोष्टीत कोणताही अभिनिवेश कधीही दिसलेला नाही. तिच्या असंख्य मुलाखतींची पारायणं करते मी पण तिचं दोन्ही खांद्यांमध्ये मान मुरवून हसणं तिच्या वयाच्या सगळ्या टप्प्यांवर सारखंच आहे. आदब, दरारा, डिग्निटी हे शब्द लता, दुर्गाबाई, सुनिताबाई वगैरे स्त्रियांकडे बघितल्यावर जरा जास्त समजलेत मला. सेल्फ मेड असणं, स्वतःच्या महत्तेची यथार्थ जाणीव बाळगणं, हरेक ठिकाणी स्वतःचा स्टॅंड ठेवणं, आवश्यक तिथे जगाला सपशेल फाट्यावर मारणं, दर्जा आणि मेहनतीशी नो तडजोड. कायमच अगणित दंडवत आहेत. #LataMangeshkar
Wednesday, February 3, 2021
बजेटमध्ये मटणाचे दर मर्यादित ठेवा अशी कुण्या कोल्हापूरकराची निर्मलाताईंना केलेली विनंती फिरतेय व्हॉट्स अप वर. आपण कोल्हापुरातल्या रस्त्यांबद्दल अशी कळकळ केव्हा दाखवणार आहोत? मटणासाठी हायकोर्टात धावू शकतो, तर कित्येक वर्षे गाड्यांइतकीच हाडंही खिळखिळी करणा-या रस्त्यांसाठीही नको का जायला? फक्त मटणप्रेमी एवढीच मर्यादित ओळख नाही ना कोल्हापूरची, ह्या इतर जीवनावश्यक गोष्टीही महत्त्वाच्या आहेत ना?