म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, January 14, 2023

 सगळ्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा

🤗
यंदाच्या शुभेच्छांमध्ये एक फरक करावासा वाटतोय तो म्हणजे माझ्याशी बहुतेक सगळे गोड बोलतातच, पण मला स्वतःलाच वारंवार सांगायला हवंय की आपण सगळ्यांशी गोड बोलायचंय. गोड इन द सेन्स, जेन्युईनली नीट (अनि म्हणतो, तसं), नॉट पॉलिटिकली करेक्ट. कठीण गोष्ट बोला-सांगायची असेल तरी ती सांगताना योग्य टोन, बरोबर पीच आणि समतोल शब्दनिवड. हे जमवावं लागणारे आता. हाय टाईम. हा फीडबॅक चिरंजिवांकडून सातत्यानं येतोय म्हणून आणखी तीव्रतेनं मनावर घेणं आवश्यक आहे. मी कशी बोलते हे तो नेमक्या शब्दात सांगतो आणि ते खरोखरच चिंतनीय आहे.
ही सचिनची क्लिप शेअर करण्याचा तो एक हेतू आहे. ह्या माणसाला मी ह्या क्लिपच्या कॉमेंटमध्ये लिहिलंय की कंपोझ्ड, शांत आणि संयमी बोलण्याची, आणि कितीही कठीण प्रसंग किंवा ताण असेल तरी डोकं थंड कसं ठेवायचं, चुकीच्या पद्धतीनं रिअॅक्ट कसं व्हायचं नाही, मुळात आवश्यक असल्याशिवाय बोलायचं नाही, याची शिकवणी घे. फक्त नीट बोललं तरी जगात ८०% शांतता पसरेल. कारण तेवढ्या करण्यानं मुद्दा पोचतो आणि मुद्द्यावरचा फोकस टिकून रहातो. सचिन एक मोस्ट अॅप्ट माणूस आहे हे शिकवण्यासाठी. कोणकोणत्या परिस्थितीतून तो गेलाय आणि कसा वागलाय ते आपण सगळ्यांनी बघितलंय. नो अभिनिवेश, नो आवेश, नो जस्टिफिकेशन, नो जजमेंट्स.
पण इतकं लांब कशाला, माझ्या अवतीभवती असलेली अशी काही माणसंही मी नियमित बघतेय. Shobhana Tirthali, Chitra Abhyankar, Chaitanya Dixit, कौतुक शिरोडकर हे लोक असे पॉईज्ड, लेव्हलहेडेड असतात कायम. केव्हाही बोला, त्यांना मी नेहमी असं स्थिरचित्त बोलताना, आपल्याला ऐकताना बघत आलेय. चैतन्य तर कितीतरी लहान आहे माझ्यापेक्षा, पण त्याच्या या वयातलं बोलण्याचं वळण माझ्यात योग्य वयात असतं तर अनेक प्रसंगांनी चांगलं वळण घेतलं असतं.
असे आणखीही आहेत बरेच जण, पण या काही सुजनांना तरी आज गोड बोलण्याच्या दिवसाचं निमित्त साधून ही छोटीशी पोच द्यावीशी वाटली. त्यांच्याशी बोलताना मला नेहमी जागेवर आल्यासारखं, स्थिर वाटतं. माझ्याशी बोलल्यावर तसं इतरांना वाटावं असे प्रयत्न मला करायला पाहिजेत. आता ते मी करेन.
तुमच्याभोवती कोण कोण आहेत असे उत्तम बोलणारे? त्यांनाही तुमचा अभिप्राय अवश्य पोचवा.
बोला, अमृत बोला.
https://www.facebook.com/reel/939185287457252

No comments:

Post a Comment