म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, January 17, 2023

 हा मुलगा मला जाऽऽऽऽम आवडतो. त्यामुळे ही मुलाखत अगदी चवीनं बघितली. अपेक्षेप्रमाणं ओघानं प्रेमात पडणं रीतसर झालेलं आहे. भारीच लोभस पोरगं आहे!

यापूर्वी या मालिकेतली राजन भिसेंची मुलाखत अशीच फार आवडली होती. तोही माणूस असाच क्रश मटेरियल आहे. त्या गप्पांमध्ये खास करून त्यांनी नाटक या विषयावर बोललेलं आवर्जून ऐकण्यासारखं आहे.
आत्तापर्यंत दिल के करीबमधल्या अनेक मुलाखती आवडल्या. पण काही आवर्जून रंगाव्या अशी अपेक्षा होती, त्या फुस्सच झाल्या. कशानं काय की. त्यातले रविंद्र मंकणी चटकन आठवले. एकतर सुलेखाच्या टीमचा अभ्यास कमी पडला आणि दोघांपैकी कुणाचाही सूर लागलाच नाही. वास्तविक त्यांची मुलाखत अशी ती पहिलीच होती म्हणे. असंही होतं. अस्तु.
https://www.youtube.com/watch?v=LUMKFpcWhnI

No comments:

Post a Comment