म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, January 31, 2023

 येत्या सोमवारी, ६ तारखेला लताला अंतर्धान पावून वर्ष होतंय.

ती जरी नित्यक्रमाचा भाग असली तरी त्यानिमित्तानं हा विशेष स्मरण सप्ताह करू या का? तुम्हाला तिची कोणत्या प्रकारातली आणि भाषेतली कोणती गाणी विशेष आवडतात, शक्य असल्यास ती का आवडतात ते सांगा, इतरांनाही (पक्षी: मलाच!) ऐकवा. फारशा प्रसिद्ध नसलेल्या मुलाखती शेअर केल्यास बघता येतील. जमत असल्यास हौशी मंडळी (पुण्यातली) रविवारी भेटून एकत्र काही गाणी ऐकूही.
आजचं गाणं - ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता.
चैतन्य दीक्षित केवळ या एका गाण्याबद्दलही लताला भारतरत्न देणारे तर मी त्याच्या संगीतासाठी मीनाताईंना. बाकी गाण्याच्या अवघडपणाबद्दल एकमुखानं एकमत आहेच.
हे सह्याद्री वाहिनीवरचं एक लतासंदर्भातलं चांगलंसं संकलन आहे, बहुतेकांनी पाहिलं असेल.
https://www.youtube.com/watch?v=2KTkxBSQeuc

No comments:

Post a Comment