म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, December 27, 2019

 खरंच! सध्या अनेक ताण आहेत. त्यामध्ये अलिकडेच बेकारीचीही भर पडली आहे. पण कोणतीही फेज कायम रहात नाही, एवढी खूणगाठ मनाशी प्रत्येकाने बांधायलाच हवी. असं म्हणणंही तितकंसं सोपं नाही. डॉक्टरांना नियमित भेटत, औषधं घेत, मित्रमंडळींशी सतत बोलतं राहून, कधी मनसोक्त हुंदडत, कधी पोटभर रडत, तर कधी स्वस्थ बसून आधी अनेक गोष्टी स्वत:शी स्विकारून मगच हे लिहू शकते आहे. मदत देण्यात आहे तसाच आनंद ती घेण्यातही आहे. आपल्याला जाणवत नसलं तरी, आपल्या अस्तित्वाला महत्त्व आहे, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी, कुटुंबासाठी, जीवलग मित्रमंडळींसाठी. प्रत्येकाला, अगदी लहान मुलांनाही ताण आहेत आता, पण ताणाचे दिवसही जातात. आयुष्य खरंच सुंदर आहे ह्याबद्दल आपणही खात्री ठेवायला हवी आणि आजुबाजुच्यांना, मुलांनाही ती पटवून द्यायला हवी. असा कुणी धीर सोडला की वाईट वाटतं, भले ओळखपाळख नसेना.

No comments:

Post a Comment