आवडत्या कवीची आवडत्या संगितकारानं सजवलेली अत्यंत लाडकी रचना. कित्येक वर्षं मी हे शब्द माऊलींचे आहेत असंच समजत होते, फुलांचे केसरा, अमॄताचा चंद्रमा वगैरे शब्दयोजनांमुळे. पण हे मंगुआजोबा आहेत हे कळल्यावर प्रचंड आदर वाटला. तेव्हापासून माझ्यासाठी तरी ते 'द पाडगावकर' झाले. उषाताई भलत्या मधाळ गायल्यायत. त्यांच्याकडून असं ऑफबीट मीना खडीकर, मानस मुखर्जी, विश्वनाथ मोरे आणि अर्थातच खळेकाकांनी अप्रतिम गाऊन घेतलंय. पाडगावकरांना आठवताना नेहमी प्रथम हे गीत येतं मनात, म्हणून आज ह्याच गीतानं त्यांना अभिवादन. ~~~आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी~~~~
No comments:
Post a Comment