म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, January 29, 2021

 माझे वडील नियमितपणे पण डोकं बाजूला ठेवून काही मालिका बघतात. नीट ऐकू येत असूनही वयोमानानुसार आवाज मोठा ठेवून बघणं त्यांना बरं वाटतं. घरं काही इतकी मोठी नसतात, मग इच्छा असो नसो, अख्ख्या मालिका इतर कुटुंबीयांच्या कानावर पडत रहातात. त्यामुळे तुम्ही कशाला बघता वगैरे तत्सम मुद्दे गैरलागू आहेत. शिवाय ८० वगैरे वयोगटाशी प्रबोधनात्मक वादविवाद करणं तारतम्याचं नाही. त्यामुळे प्रश्न तर पडतातच, ते उभे केलेच पाहिजेत. तुम्ही दर्जेदार माल आणा, असलं निकृष्ट बघतात तर सकसही बघतीलच. त्यासाठी हातपाय आपणच हलवले पाहिजेत.

No comments:

Post a Comment