म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, May 10, 2022

 मन:पुर्वक आदरांजली, पंडितजी.

तुमच्या प्रसन्न शास्त्रीय कलाविष्काराइतकंच तुमचं मधूर चित्रपटसंगीतही खूप आवडत आलंय. आम्हां सामान्य रसिकांसाठी थुईथुई नाचणाऱ्या संतूरइतकेच सिलसिला, लम्हें वगैरेही यादगार.
माझी आठवण दगा देत नसेल तर २०१७ ला रमणबागेत सवाईत पहिल्या दिवशी तुमच्या अप्रतिम वादनानं सांगता झाली. दुसऱ्या दिवशीच्या जोरदार पावसामुळे नंतरचा संपूर्ण महोत्सव रद्द झाला. पुढच्या वर्षी सवाई कटारीयाला आयोजित केलं गेलं. तिकडे काही जाणं झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याशी निगडित ही आठवण कायम लक्षात राहील. त्यावेळी तुमचा फोटो घेण्याचा हा एक क्षीण प्रयत्न केला होता.


No comments:

Post a Comment