म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, May 9, 2022

 आपल्याच आईला अभिवादन वगैरे फार कृत्रिम होईल, नाही?

छत्तीस वर्षांपूर्वी आमच्या मातोश्रींनी प्रस्थान ठेवलं. अवघ्या एकतिसाव्या वर्षी भराभर खेळून, फटकेबाजी करत इनिंग संपवलीसुद्धा. तिला शब्दशः 'मरणाची घाई' झाली होती. देखणी, बुद्धिमान, उत्कृष्ट गायिका, कर्तृत्ववान, गृहकृत्यदक्ष, शिस्तबद्ध, मॉडर्न, लोकप्रिय आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी अनेक विशेषणं चपखल शोभणारी होती ती. केवळ १८-३१ एवढ्या जेमतेम तेरा वर्षांमधे जबरदस्त कर्तबगारी गाजवली तिनं. व्यवसायामुळे प्रचंड जनसंपर्क होता. आजही अनेक अनोळखी लोक, दूरदूरचे नातेवाईक तिच्याबद्दल भरभरून बोलतात सांगतात तेव्हा नेमकं काय वाटतं ते शब्दात पकडता येत नाही. हे दिप्तीनं लिहिलेलं वाचूनही तसंच होतंय, नेमकं काय वाटलं पाहिजे कळत नाहीये. पण ते वाटणं दु:खद नक्की नाही. कारण मध्यंतरीच्या काळात पुलाखालून अख्खे समुद्रच्या समुद्र वाहून गेले आहेत. त्यामुळे एक छानसा तटस्थपणा आलेला आहे, तेव्हा कृपया सहानुभूती नको. हा उद्धटपणा वाटला तर त्याबद्दल खरंच माफ करा.


No comments:

Post a Comment