कायमच आणि आजसुद्धा रोजच्या दिवसाचा अविभाज्य भाग असलेल्या लाडक्या विविध भारतीचा आज वाढदिवस
एकीकडे काम आणि एकीकडे ऐकणं हे हातात हात घालूनच चालतं. मनोरंजनाचे अनंत पर्याय उपलब्ध असले तरी VVB प्रसारित करत असलेल्या आनंदाला आणि दर्जाला आजही तोड नाही. संगीत सरिता, जयमाला, हवामहल, सखी सहेली, उजाले उनकी यादों के, आज के फनकार, सांजधारा, बेला के फूल हे सहसा चुकत नाहीत. बाकी गाण्यांचे सगळे कार्यक्रम आणि जुन्या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण वगैरे तर सुरुच असतात. ठराविक वेळी वाजणाऱ्या ठराविक जाहिराती वेळ सांगत रहातात. असं वाटतं की कालचक्राप्रमाणं हेही सगळं शेवटपर्यंत चालू राहील. चालायला गेल्यावर किंवा प्रवासात युट्युबवर सदाबहार नगमे, छायागीत, विशेष जयमाला, अमीन सायानींच्या गीतमाला ऐकणं फार सोयीचं पडतं. कारण त्यात जाहिराती फार लागत नाहीत. सगळेच निवेदक उत्तम आहेत, पण ममता सिंग आणि युनुस खान विशेष आवडतात.
Long live VVB
गांव गांव शहर शहर, बस एक लहर, बस एक लहर
देश की सुरीली धडकन, विविध भारती!
No comments:
Post a Comment