शिरस्त्याप्रमाणे चिरंजिवांनी सकाळच्या पहिल्या सत्रातल्या हेडलाईन्स वाचून दाखवताना शेजारशेजारच्या दोन बातम्यांमधली ही विसंगती मार्मिकपणे टिपली. बियालियात्स्कींचं नाव खडखडीतपणे वाचत शांततेचं नोबेल आणि भारताने चीनला, अमेरिकेला ठणकावले-खडसावले हे एकत्र वाचून आज आमची सकाळ जोरदार हसरी झाली.
त्याच वाहत्या गंगेत हात धुवत, संभाषण रात्रीच उडालेल्या आमच्या जोरदार चकमक-कम-खडाजंगीवर गडगडत आणून, मला शांततेचं नोबेल मिळण्याची निदान ह्या जन्मीची तरी पात्रता मी गमावली असल्याचे मला सौजन्यपूर्वक सांगण्यात आले. मी जर अशीच कडकडत राहिले तर पुढचेही काही जन्म बुक होतील हे न उच्चारलेलंही काहीतरी ऐकू आलं मला.
तशी सूज्ञ आहे मी, यु नो!
No comments:
Post a Comment