म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, December 31, 2016

In your remembrance - 2
****************************************
Under the moonlight - Grayson Kessenich
************************************************************

Under The Moon Light
There was a time, when I was yours and you were mine
When love was easy and life was fine
The world was clear and bright
I’d breathe the air, and know you sent it to meet me there
I had no worries I had no cares
Just knowing you were there
‘til the morning light, dances in the sky
When the sun is up over my head, but in the meantime
Let the evening fall, on me after all
I know you are just up ahead, under the moonlight
Years go by, seasons change and the leaves go dry
Fall from their place as they leave the sky
And find a home below
The wind it blows, pages turn and the doors are closed
And all I learn is that I don’t know
But what is love without you
‘til the morning light, dances in the sky
When the sun is up over my head, but in the meantime
Let the evening fall, on me after all
I know you are just up ahead, under the moonlight

https://www.youtube.com/watch?v=CjmZGERNiQs

Friday, December 30, 2016

In your remembrance - 1
*******************************************
Leonardo Cohen's "Dance me to the end of love"
and amazing 'The' Al Pacino of Scent of a woman..
*****************************************************************

"Dance Me To The End Of Love"

Dance me to your beauty with a burning violin
Dance me through the panic 'til I'm gathered safely in
Lift me like an olive branch and be my homeward dove
Dance me to the end of love

Oh let me see your beauty when the witnesses are gone
Let me feel you moving like they do in Babylon
Show me slowly what I only know the limits of
Dance me to the end of love

Dance me to the wedding now, dance me on and on
Dance me very tenderly and dance me very long
We're both of us beneath our love, we're both of us above
Dance me to the end of love

Dance me to the children who are asking to be born
Dance me through the curtains that our kisses have outworn
Raise a tent of shelter now, though every thread is torn
Dance me to the end of love

Dance me to your beauty with a burning violin
Dance me through the panic till I'm gathered safely in
Touch me with your naked hand or touch me with your glove
Dance me to the end of love

https://www.youtube.com/watch?v=IEVow6kr5nI

Thursday, December 29, 2016

Sunday, December 18, 2016

वाचनीय. सध्या वाढलेल्या स्तोमाचा चांगला आढावा घेतलाय. अनेक चांगले समज पक्के आणि अनेक गैरसमज दूर झाले.

http://www.loksatta.com/lekha-news/western-food-harmful-or-healthy-1364078/
मित्रमैत्रिणींनो,
कळवण्यास आनंद होतोय, की पैठणी आणि पैठणी उत्पादनांचा माझा स्वतःचा ब्रँड सुरू करते आहे, "चैत्र पैठणी". खालील फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. पैठणी साडीसोबतच पैठणीपासून तयार केलेली कुर्ता मटेरिअल्स, दुपट्टे, पर्सेस, क्लचेस, ज्युवेलरी बॉक्सेस तर पुरुषांसाठी सोवळी आणि कुर्ता मटेरिअल्स असे विविध प्रकार उपलब्ध होऊ शकतील. स्वतःच्या आवडीप्रमाणे पैठणी तयारदेखिल करून घेता येईल.

लोभ आणि शुभेच्छा असू द्याव्यात _/\_

https://www.facebook.com/profile.php?id=100014470479144

Tuesday, December 6, 2016

तेरे खयालों में, तेरेही ख्वाबोंमें, दिन जाये, रैना जाये रे, जाने ना तू सावरीया
https://www.youtube.com/watch?v=fNwMYFIh3UA

Thursday, November 24, 2016

'कलके सपने आज भी आना' - डॉ. लता

एक शेतकरी एके सकाळी त्याच्या तीन मुलांना बोलवून त्यांच्या हातावर एकेक रुपया ठेवतो आणि सांगतो, ह्यामधून संपूर्ण घर भरून टाका. तिघांतला एक मुलगा त्या एक रुपयातून काही उद्बत्त्या आणतो आणि सगळं घर त्या सुगंधाने भरून प्रसन्न करून टाकतो. लहानपणी अनेकदा ऐकलेली ही गोष्ट आज सकाळी अचानक आठवली.

अगदी तसं, लताचं 'कलके सपने आज भी आना' ऐकताना सगळं घर त्या रसरशीत स्वरांनीआणि प्रसन्नतेनं भरून गेल्यासारखं वाटतं. त्यातही जर सकाळी सकाळी कानावर अशी प्रफुल्लित लता आली तर त्या आवाजातला रेमेडी, थेरपी, हा गुणधर्म जास्त प्रकर्षाने जाणवतो. यू अॅक्चुली फील ट्रीटेड. हे अख्खंच गाणं सुंदर आहे, पण त्यातही 'झूमते बादल गाते झरने'च्याआधी लता दोन छोटे आलाप उतरून पुन्हा 'झुम'ला एक मुरकी घेते, तेव्हा ती मुरकी वहिदानंही हातानं दाखवली आहे आणि त्याआधी छोट्या आलापांनाही वहिदा खरंच उतार उतरत आली आहे. ती तेवढी जागाच अफलातून आहे. चित्तवृत्ती फुलणे हे क्रियापद बहुदा कादंब-यांमध्येच वाचायला मिळणारं, पण हे गाणं ऐकताना आणि पहातानाही त्या क्रियापदाची अनुभूती प्रत्यक्ष घेता येते, इतकी ही लता-वहिदाची युती सूरदेखणी आहे. शकील बदायुनी आणि नौशादमियाँनाही कुर्निसात आहेच, त्यांना विसरून कसं चालेल!

https://www.youtube.com/watch?v=QbRkEAueb24

Sunday, November 13, 2016

बँक ऑफ इंडिया, सिंहगड रस्ता शाखेचे सर्व आजी-माजी कर्मचारी आणि बँक व्यवस्थापन,
आम्हाला दिलेल्या सर्व सहकार्यासाठी आणि सेवेसाठी सर्वांचे मनापासून आभार :-)
विशेषतः निवृत्त कर्मचा-यांनीही येऊन गाडा उचलायला हातभार लावल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि विशेष आभार!
अशीही बातमी वाचनात आली, की बँकेच्या काही शाखांनी रांगांमध्ये उभ्या ग्राहकांसाठी खुर्च्यांची, पाण्याची आणि मंडप घालून सावलीची व्यवस्था केली आहे. तिष्ठणं तेवढंच सुकर. :-)

#नोटाबंदी

Friday, November 11, 2016

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा |
करी अंगसंगा भक्ताचिया ||

कार्तिकी एकादशी

https://www.youtube.com/watch?v=aXFHFJUZ2p0

Wednesday, October 26, 2016

आदरणीय प्रिय पंडितजी,

ऋणी असावं, कायम रहावं, अशा अनंत गोष्टी आहेत आयुष्यात. त्यात तुम्ही दोघं भावंडं फार वर, तिथे कुठेतरी आहात. दीदी, पु ल, कुमार, किशोरीताई, खळेकाका, तुम्ही, ही पीठं आहात, फक्त व्यक्ती नाही. तुम्हा कुणाहीबद्दल काही बोलावं इतकी योग्यता नाही. तुमच्या जीवनकालात जन्माला आलो, श्रवणासाठी धडधाकट कान मिळाले आणि कानावर काय पडतंय त्याची जाण मिळाली हे अहोभाग्य आहे.

अभ्यास किती आणि कसा असावा, सर्वोत्तमाचा ध्यास, तो निर्मितीमध्ये कसा रेखावा हे वस्तूपाठ. स्वतःला पटेल तेच करावं आणि तरीसुद्धा प्रवाहात उठून दिसावं म्हणजे कमाल आहे. स्वत्व जपणारी आणि ठसा उमटवणारी एकेक रचना, त्यामागचा विचार, त्यासाठी समजून सवरून निवडलेले राग, स्वरावली, वाद्यं, आवाज आणि ह्या सर्वाचं एकजिनसी, प्रभावी स्वरूप. प्रत्येक निर्मिती ही जणू मैलाचा दगड. हे सर्व ऐकताना आणि गुरूमुखातून समजून घेताना अचंबा होतो, ब्रह्मानंदी लागते. इतकं करून बरचसं डोक्यावरून जातं, स्वतःच्या अपु-या वकुबाची जाणीव होते. नीट आकलन व्हायला आणखी बरीच वर्षं जावी लागतील. फक्त इतकं मात्र नक्की जाणवतं, की तुमच्या आणि दीदींनी गायलेल्या एकेक रचना ऐकताना मनातला आणि बाहेरचाही कोलाहल दूर दूर होत जातो आणि मातीच्या कुशीत ओलावा झिरपत जावा तशी मनात शांतता, स्निग्धता पसरत जाते. त्या अनुभूतीसाठी मग पुन्हा पुन्हा तुमची गाणी ऐकली जातात. जितकं समजतं, झिरपतं, ते खेचून, ओढून कवेत घेतं, अनेकवेळा हातचं व्यवधान बाजूला सरकवून, स्वस्थ होऊन तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं, इतकी ताकद. साक्षात दीदींनी तुम्हाला गुरू मानावं, तिथे आमची काय कथा!

एक गंमत आहे. पूर्वी अनेकदा अनेकांशी भक्त होऊन आपापल्या देवाची बाजू घेऊन इरेसरीनं वाद घातले, आता तसं होत नाही. अवयव गळून पडावा तशी ती सुरसुरीही वाटेतच कुठेतरी गळून पडली. अलौकिक गाणं ऐकताना किंवा अस्तित्व विसरायला लावणारं पुस्तक वाचताना त्याबद्दल कुणाला पटवून सांगावं ही गरजच नाहीशी झाली. हे काय, कधी आणि कसं झालं ते तुम्हीच सगळे जाणे. हेसुद्धा सृजनाचंच एखादं रूप असावं.

परवा तुम्ही पाया पडू नका म्हणालात सगळ्यांना. पण आपण ज्यांना मनोभावे मानतो, जी आपली श्रद्धास्थानं आहेत, अशी माणसं मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. त्यातही त्यांच्या पायावर डोकं टेकवता येण्याचा योग तर आणखी दुर्मिळ. म्हणून तुम्हाला सांगून तुमचं न ऐकण्याचं औधत्य केलं. एरवी तुमचं सगळंच तर ऐकत असतो!

वाढदिवस आणि दिवाळीनिमित्त अभिष्टचिंतन आणि तुम्हाला उदंड निरामय आयुष्य लाभो ही मनःपुर्वक शुभेच्छा.

आपली नम्र,
सई.

Monday, October 17, 2016

आज बहुतेकांच्या भिंतीवर ताईत दिसतो आहे :-)
# स्मितापाटील

Feeling connected.

https://www.youtube.com/watch?v=bDpS1NqUapg

Sunday, October 16, 2016

लेकाच्या वयोगटातली कुटुंबातली किंवा मित्रमंडळींमधली मोठी भावंडं आठवताना आज एक चांगला एक्सरसाईज झाला. क्वचित अपवाद वगळता सगळ्याच घरी एकेकटी मुलं आहेत. ज्येष्ठ अपत्य म्हणजे काय आणि कोण हे शोधताना आई-बाबांची किंवा आजी-आजोबांचीच भावंडं आठवणं जास्त सोपं गेलं. आपोआप काका-आत्या-मामा-मावशांमधली मोठी, मधली, धाकटी, ही उतरंडही मजेमजेत उलटसुलट उलगडून बघितली गेली.

आता जुन्या प्रथेत बदल करून समान न्यायानं सर्वांनाच ओवाळायचं असतंय. तरी त्यानिमित्तानं वेद-अनिश, मिहिका-कणाद, आई आणि दिपुमावशी, स्वरा, बाबा आणि आत्या, ऋतू आणि समृद्धी, अशा अनेक नामावळ्या नेहमीपेक्षा वेगळ्या कारणानं बोलण्यात आल्या. प्रथा अशाच कारणांसाठी महत्त्वाच्या वाटतात, एरवी मग रटाळ रुटीन असतंयच.

Tuesday, October 11, 2016

Happyness is सुट्टी, हातात पेंडींग यादीतलं पुस्तक, मनचाहे गीत + सदाबहार नग्में.

:-) ||शुभ दसरा|| :-)

Saturday, October 1, 2016

अश्विन खेळायला निघाला होता. आषाढाला आईनं केव्हाच हाका मारून घरी बोलवून नेलं होतं, पण त्याचं खेळून पोट भरलं नव्हतं. अश्विनाला जाताना बघून आषाढानं खिडकीतून त्याला विचारलं,
"मी पण येऊ तुझ्याबरोबर खेळायला?"
अश्विन म्हणाला, "हो, चल की!"
अश्विन आणि आषाढ हातात हात घालून उड्या मारत खेळायला गेले.

Friday, September 30, 2016

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सहामाही परिक्षा लिहीण्यासाठी दि. ४ ऑक्टोबरपासून पुढे साधारण महिनाभर शंभरेक लेखनिकांची तातडीने आवश्यकता आहे. विद्यापिठीय परिक्षांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही माध्यमांतून आणि शालेय पातळीवर सर्व विषयांसाठी. वयोगट कोणताही चालेल.

कृपया शक्य असलेल्यांनी लगेच संपर्क साधावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी लेखनिक मिळवून देण्यास मदत केल्यास बरे होईल.

Wednesday, September 28, 2016

आयुष्याच्या मुळ्या निसर्गनियमानं मातीचा ठाव घेत खोल शिरतायत, अनेक झाडं मात्रं वेलीच्या आधारानं उभी आहेत.

तुझं खळखळणारं हसू आणि निरामय स्वास्थ्य निरंतर राहो :-)

तू आणि माऊली हे माझं सर्वात आवडतं काँबिनेशन आहे :-)

ओम नमोजी आद्या.. https://www.youtube.com/watch?v=KNDt3sYt0Os

Sunday, September 25, 2016

घरादारात, शहरात, राज्यात, देशात, सगळ्या वातावरणात तणाव आहे.
मात्र आता आठवडाभर हवेत 'लता'ही असेल, त्यामुळे जरा सुसह्य होईल सगळं.

Tuesday, September 20, 2016

आलिया भोगासी, असावे स'आ'दर...

कणिक मळता येत नाही, की थालिपीठ थापता येत नाही
भाज्या चिरता येत नाहीत, की डबे उघडता येत नाहीत
खिट्टी काढता येत नाही, की लिफ्टचं दार ओढता येत नाही
पेन धरता येत नाही, की रजिस्टर उचलता येत नाही
हँडल धरून इग्निशन की फिरवता येत नाही, की ब्रेक दाबून पाय टेकवता येत नाही
चढता येत नाही, की उतरता येत नाही
झोपलं की कूस बदलता येत नाही, बसून उठलं की पाऊल टाकता येत नाही

ही आहे गोष्ट सध्या हवेत पसरलेल्या व्हायरल इन्फेक्शनची. शरीरामध्ये जितके सांधे जोडण्या असतात, ते सर्व एकजात एकावेळी असहकार चळवळीच्या मूकमोर्चात वेदनेच्या अस्त्रासह सामील झालेत. कोणीतरी बेदम चोप दिल्यासारखी अवस्था आहे. तापाच्या धगीनं त्वचा करपतेय. औषधांचा कितीही भडीमार केला तरी शब्दश: हत्तीच्या पावलांनी दाणदाण चालून येऊन मुंगीच्या पावलांनी उगीच दाण्यादाण्यानं सरकत बरं होणारं हे आजारपण. त्यात दुष्काळात तेराव्या महिन्यासारखं गच्च मळभ आणि धुंधूर पाऊस. परिस्थिती आणखी बिकट.

सकाळी उठल्यावर पहिला तासभर तर नुसती संवेदनाच जागी होते, सांधे तसेच झोपलेले, आखडलेले. मग त्यांना चुचकारून जागं करावं लागतं. कसेतरी कुरकुरत जागं झाल्यावर मग पुढे दिवसभर मेंदूचा आदेश दहादा सांगितल्यावरच ऐकायचा हा ठाम पवित्रा. गुडघे, मनगटं, घोटे, पिंढ-या हे तालेवार शिलेदार तर दम काढतातच, पण हातापायाच्या बोटांची पेरं, महिने मोजायची हाडं, पावलांचे सांधे हे मावळेसुद्धा बरोबरीनं, त्याच त्वेषानं लढतात आणि रडकुंडीला आणतात.

फणफणून आडवं व्हायला जेमतेम एक तास पुरला, बरं व्हायला मात्र महिने लागतील. तोवर आहेच आता.. लडखडत चालणं, लंगडत उतरणं, कैलास जीवनच्या जाहिरातीतल्या आजोबांसारखे वेडेवाकडे चेहरे करत वस्तू उचलणं, पहिल्यांदाच स्वैपाक करत असल्यासारख्या ओबडधोबड चिरलेल्या भाज्या न् नकाशांचे आकार, वन डीश मिल्सचा सुकाळ, सुप अन् सँडवीचच्या सोयीचा साक्षात्कार वगैरे वगैरे..

घराघरात, बघेल तिकडे समदु:खी दिसतायत, कंपनी मिळतेय, लागू पडलेल्या औषधोपचारांची देवाणघेवाण होतेय, चहू दिशांनी काळजी घ्या काळजी घ्याचे पडघम वाजतायत, आता वर्तमानपत्रंही वेदनांना वाचा फोडतायत.

तर, अशी सगळी मजा मजा सुरू आहे.
आलिया भोगासी, असावे सादर _/\_

Thursday, September 15, 2016

सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला पोचले, तर शुकशुकाट! आज ऑफिसला सुट्टी होती आणि मला तंद्रीत ते माहितीच नव्हतं! क्षणभर काय करावं प्रश्न पडला. दोन मिनिटं तिथेच थांबून लगेच पडलेल्या प्रश्नावर विचार केला आणि युक्ती सुचली.
उत्सवी गंधाच्या दरवळाची सुंदर हवा होती, भुरुभुरू पाऊस होता, ओलसर झालेला कर्वे रस्ता बराचसा रिकामा होता आणि अनपेक्षितपणे अशी अचानक मिळालेली सुट्टी :-) मिरवणुकीचे गणपती रांगेला लागायला बराच वेळ होता अजून. मात्र तरी वर्दळ अगदीच तुरळक होती.
गाडी वळवून कर्वे रस्त्यावर छानपैकी भटकले. डेक्कन कॉर्नर ते पौड फाटा. रमत गमत, उगीचच रेंगाळत, निवांतपणे चार घिरट्या घातल्या. इतकं प्रसन्न वाटत होतं की बस्स! :-) अशी पर्वणी क्वचित मिळत असेल. ठरवलं तरी हे साधता यायचं नाही.
अशावेळी हातातल्या दुचाकीचा आनंदही द्विगुणित होतो.
त्या क्षणी हातात सायकल असती तर आणखी आनंद मिळाला असता, पण हरकत नाही! फिर कभी!!
अनंत चतुर्दशी, अशीही :-)
गणपतीबाप्पालाही माझा हेवा वाटला असेल नक्कीच :-)

Tuesday, September 6, 2016

अवि, तुझे कुमार.. निरंतर ऐकलेस आणि ऐकवलेसही.

https://www.youtube.com/watch?v=l1SpZ7tf4DY

Friday, August 26, 2016

पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य (१९८३ ते १९९०) आणि इंग्रजीचे व्यासंगी विद्वान प्रिं. भगवान ना. तथा बी. एन. कुलकर्णी ह्यांचे आज दुपारी दु:खद निधन झाले. ते आमच्या मोठ्या आत्याचे यजमान होत. ते ८७ वर्षांचे होते.

आईवडिलांचं छत्र नसताना, फार हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन त्यांनी मेहनतीनं स्वतःचं आदरणीय स्थान निर्माण केलं. त्यांच्या पंचाहत्तरीच्या वेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख वाचनात आले तेव्हा ते प्रकर्षानं जाणवलं.

ते प्राचार्य असताना आम्ही लहान होतो. स प च्या आवारातल्या प्रशस्त प्राचार्य निवासातल्या सुट्ट्या विशेष लक्षात आहेत. नऊ मोठाल्या दालनवजा खोल्यांची ती ब्रिटिश शैलीतली बंगली आहे, लाकडी चौकटींचे मोठाले व्हरांडे होते, स्टडी हा प्रकारही मी तिथे पहिल्यांदा बघितला. नंतर मग पुस्तकांमधून वाचायला मिळाला. प्राचार्य निवासाभोवती तेव्हा तरी गर्द आमराई होती. भोवती फुलझाडांंचे फुललेले ताटवे आणि वाफे होते. नियमीत देखभाल करणारे माळी होते. बागेत उघडणा-या दारासमोर असलेल्या एका आंब्याच्या जमिनीला समांतर फांदीला झोपाळा बांधलेला होता. कॉलेजच्या वेळा संपल्यावर सगळं चिडीचूप शांत व्हायचं. आता पर्वती दिसण्याचं अप्रूप राहिलं नसलं तरी तेव्हा ती मैदानातून अशी हात लावला तर टेकेल इतक्या अंतरावर दिसायची. मोठी, पुस्तकांनी गच्च आणि सतत भर पडणारी लायब्ररी होती. शहराच्या ऐन गर्दीत असून बाहेर लगेचच अहोरात्र वहाणारे मोठे रस्ते आहेत हे आत जराही कळायचं नाही. त्या टुमदार आणि केवळ पुस्तकातच शोभाव्या अशा प्रासादात काकांच्यामुळे आम्हालाही रहायला मिळालं, हे मोठंच भाग्य. तेव्हा काकांना नक्की कुणी कुणी मोठे दिग्गज भेटायला येत असणार, पण त्या व्यक्तिमत्वांची, चर्चांची महती समजण्याचं आमचं वयच नव्हतं हे आता जाणवतं. त्यामुळे काकांबद्दलच्या आठवणी ह्या अशा त्यांच्या आजुबाजूच्याच जास्त आहेत.

मी नॅशनल जिओग्राफिक मासिक आणि इलस्ट्रेटेड वीकली प्रथम काकांकडे बघितलं. इलस्ट्रेटेड वीकली तर कोल्हापुरात येतच नव्हता तेव्हा. आमचा धाकटा काका पुण्याहून येताना बी एन् काकांकडून घेऊन यायचा ते आठवतंय. मी नववीला असताना मला बी एन् काकांनी त्यांच्या वापरातला एक अॅल्युमिनियमचा छोटासा टेबल लँप दिला होता. दहावीचा अभ्यास मी फक्त रात्री आणि त्या लँपखाली केला. आणि अकरावीला गेल्यावर नवी वीरकरांची डिक्श्नरी भेट दिली होती. आमची आत्या जराशी कडक स्वभावाची, तिला आम्ही अजूनही दबकून असतो, त्यामानानं काका मनमोकळे होते. बाकी जगासाठी ते आदरणीय सर असले तरी आमच्यासाठी ते बी. एन्. काका होते. त्यांची विद्वत्ता कधीही घरच्यांसोबतच्या संवादात आडवी आली नाही. हसतमुख असायचे.

आम्ही मोठे झाल्यावर त्यांच्या वलयाने दबून राहिल्यामुळे म्हणा, आणि थोडेसे आत्याच्या धाकानं म्हणा, घरच्या ह्या गुरूतुल्य व्यक्तिमत्वाचा आम्ही पुरेसा लाभ घेतला नाही ही कायम खंत राहिल. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलण्याचा माझा वकूब नाही, कुटुंबियांना श्रद्धांजली वहाण्याचा आपल्याकडे प्रघात नाही, निदान माझ्या कुवतीनुसार सर्वांना त्यांची थोडी ओळख करून द्यावी असं वाटलं.

आम्हा सर्व जोशी परिवारातर्फे काकांना विनम्र अभिवादन.

Thursday, August 25, 2016

शम्मीचा गोविंदा द बेस्ट आहे, मच गया शोर तर सदाहरीत आहे.
चांदी की डाल पर सोने का मोर आणि बडी देर भई नंदलालाचं मात्र अजीर्ण झालं आता.

Wednesday, August 17, 2016

पुण्यातील मित्रमैत्रिणींनो,
नेत्रदोष असणा-या विद्यार्थ्यांचे लेखनिक म्हणून परिक्षा लिहिण्यासाठी काही रायटर्सची (स्क्राईब्ज) तातडीने आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्टला, दुपारी १२-१ आणि २-३ ह्या वेळेत परिक्षा आहेत, माध्यम मराठी, वयाची अट नाही. वेळापत्रक आणि शाळेचे तपशील इच्छूक व्हॉलेंटीअर्सना सांगितले जातील.
साधारण ४५ रायटर्सची आवश्यकता आहे. तुमच्यापैकी ज्यांना शक्य होणार असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधा.
- सई कोडोलीकर.

Sunday, July 31, 2016

पुलंना एकदा एका मैफलीत एक गृहस्थ भेटले. ते सोबत आपल्या नऊ दहा वर्षांच्या मुलाला घेऊन आले होते. पुलंनी आस्थेनं त्या गृहस्थांना विचारलं, "अरे वा, गाण्याची आवड आहे वाटतं तुमच्या मुलाला!"
ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वांच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो"
'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते.

आज मी किंवा माझी बहीण मागे वळून पहातो तेव्हा बाबांबद्दल कृतज्ञता ह्याचसाठी दाटून येते. वडील म्हणून अनंत, अगणित ठेव्यांबरोबर बाबांनी आम्हाला गाण्याचा कान दिला. घरात आई गात असायची, दोघं काका सतत गुणगुणायचे, मधला काका बुलबुल, मेंडोलीन वाजवत बसलेला असायचा, रेडिओवर सिलोन स्टेशन सुरू असायचं, नाहीतर रेकॉर्ड प्लेअरवर आणि नंतर टेपरेकॉर्डरवर सतत गाणी तरंगत असायची. धाकटा मामा मेलडी मेकर्समध्ये गायचा. आईबाबा, आत्या, काका, काकू, मामा, अख्खं घरदार अखंड काही ना काही ऐकत असायचं. घराला भिंती असतात तशा आमच्या घरात हे सुरांचे पडदे असायचे. आज मागचं काहीही आठवताना पार्श्वभूमीला कॅनव्हाससारखी ही गाणी असतात. काल पं. वसंतराव देशपांडे आणि शंकर पाटलांचे स्मृती दिन होते. ह्यासुद्धा ओळखी बाबांनीच करून दिल्या, ती नाट्यगीतं आणि कथाकथनं आजही बहिणीला श्लोका-स्तोत्रांसारखी मुखोद्गत आहेत. मोठी सुटकेस भरून रेकॉर्ड्स आणि नंतर ढिगानं कॅसेट्स् जमवल्या होत्या आईबाबांनी. रोजच्या धडपडीत तुटपुंज्या पगारात आणि जागेच्या अभावात हा छंद त्यांनी कसा काय जोपासला ह्याचं आश्चर्य वाटतं. बाबांना विचारलं तर आज त्यांनाही ते धड सांगता येत नाही. ते सहज होत गेलेलं काहीतरी होतं, ठरवून केलं गेलेलं नव्हतं. इस्टेटी केल्या नाहीत की गाड्याघोडे नाहीत, मात्र आयुष्याला चव आहे, त्यांच्या आणि आमच्याही.

अर्थात मोहम्मद रफी हे नावसुद्धा आयुष्यातला अविभाज्य भाग बनण्यात बाबांचाच हातभार मोठा आहे. बाबांचा ह्या माणसावर भलताच जीव आहे. रफीबद्दल बोलताना किंवा त्यांची काही विशिष्ट गाणी ऐकताना ते हळवे होतात. रफींची हिंदी गाणी सर्वपरिचित आहेत, बहुतेक सगळी मराठीही. आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या दुर्मिळ मराठी गाण्यांपैकी एक, मला आवडणारं.

https://www.youtube.com/watch?v=ZMRyeX5Ni_s

Wednesday, July 27, 2016

उस पार साजन इस पार धारे - चोरी चोरी

गाणी सहसा नुसतीच ऐकली जात नाहीत. त्या गाण्याशी निगडीत अनेक कनेक्शन्स असतात, ती सगळी ते गाणं ऐकताना आपल्याभोवती आपोआप फेर धरतात. कित्येक वेळा असंही होतं, की त्या गाण्याशी ह्या ना त्या मार्गाने सांगड असणारी इतरही गाणी आठवतात. हे असं होत ते गाणं ऐकणं आणखी आनंदाचं होतं मग.

'चोरी चोरी'ची गाणी हा तसाच एक फार गहन विषय आहे. एकतर ह्यातले रोमँटिक मन्नादा अवीट आहेत. सिनेमा बघितलेला नाही, पण एरवी कधीही न आवडणारा राज कपूर मला ह्या गाण्यांमधे आश्चर्यकारकरित्या आवडतो. सगळीच गाणी एकसे एक सुंदर, त्यातही 'सवा लाख की लॉटरी' आणि 'ऑल लाईन क्लियर' तर हटकेच. जरा म्हणुन कुठेही मेलडी निसटत नाही, ही खरंच कमाल आहे. त्यातल्या प्रत्येकच गाण्याबद्दल निबंध लिहिता येईल. आमची काकू ऐकायची चोरी चोरीची गाणी सारखी. त्यामुळे ही गाणी ऐकताना मला हटकून काकूसुद्धा आठवते.

पण 'उस पार साजन इस पार धारे' हे अप्रतिम गाणं मला नेहमी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. नदी, नावाडी, किनारा, लाटा, ह्यावरच्या यच्चयावत गाण्यांमध्ये हे पहिल्या पाचात. ते कायम मला 'कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी'ची आनंदी आवृत्ती वाटत आलंय. दोन्हीच्या काव्यातला आशय बराचसा जोड्या जुळवा प्रकारातला आहे. त्याची कोरिओग्राफी देखणी आहे. ही नटी कोण आहे तेही माहिती नाही. पण ती इतकी खेळकर आणि तोंड भरून हसरी आहे, की पडद्यावरचं गाणं प्रसन्न दिसतंय अगदी. ह्यातल्या वाद्यमेळाबद्दलही कुणी जाणकारानं काही उलगडून सांगितलं तर बरं होईल. गंमत म्हणजे, संगितकार शंकर जयकिशन असूनही हे गाणं ऐकताना मात्र मला ते सलील चौधरींचं असावं असं वाटतं, इतका तो लोकसंगीताचा, विशिष्ट एकसंध कोरसचा बाज आणि वापर हुबेहूब सलीलदांसारखा आहे. नाव जशी पाण्यावर हेलकावे खाते, तशाच किंचीत संथ लयीतलं, खालच्या पट्टीत सुरू होणारं. लता नेहमीसारखीच उठावदार आणि हसरत जयपुरींचे सुंदर शब्द वजनदार करणारी आहे. तिच्यासाठी वेगळं लिहिण्यासारखं काही शिल्लकच नाही आता. सगळ्या गाणंभर "हो टिम का टिंभा टिंभा, ओ कोडिया कोडिया कवलानी, गेंजी गेंजी गे़ंजी गेजळा" अशा काहीतरी त्या सुरेल कोरसच्या मजेशीर ओळी आहेत. हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत की असेच वापरले आहेत कल्पना नाही. बारकाईनं ऐकताना वरवर तरी पूर्वोत्तर भारतातल्या एखाद्या भाषेतले वाटतात, कुणाला माहिती असेल तर सांगा, उत्सुकता आहे त्या शब्दांबद्दल. ह्या ओळीसुद्धा 'टिम टिम टिम तारों के', 'ताररी आररी आररी', 'घुंगर बोले चिकीमिकी चिकिमिकी', 'लारालप्पा लारालप्पा, आदीटप्पा आदीटप्पा', 'अपलम् चपलम्' या शब्दांच्या पंगतीतल्याच. कधी अर्थासकट, कधी उगीचच. पण नादमाधुर्य वाढवणा-या. असो. शोधावं तितकं कमीच.

https://www.youtube.com/watch?v=0xWepby-ioY