तुमच्या प्लेलिस्टमधे 'प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा' नंतर 'प्यार में दिल पे मार दे गोली' येत असेल आणि आधीच्या 'गुंजाऽऽरऽव'वरच्या छोटा गंधर्वांच्या आलापीइतकाच नंतरच्या ह्या कानातून त्या कानात गेलेल्या पिस्तुलाच्या गोळीच्या आवाजाचाही तुम्ही सारखाच आनंद घेत असाल तर तुमचा धर्म कोणता? घाला बोटं!
उत्तर सापडलं तर मलाही सांगायला विसरू नका.
तोवर आपण किती खुल्या, स्वागतशील काळजाचे आहोत ह्या आनंदात मग्न होत मी पुढच्या 'लावणी भुलली अभंगाला'कडे व्हाया 'इट्स माय लाईफ' वळते.
हे असं होणारी मी एकटीच १००% नसणारे. आयुष्य आखिवरेखिव झालं तर जितकं कंटाळवाणं होईल, तितकीच ऑर्गनाइज्ड प्लेलिस्टही बोअरींग होईल. तर तुमच्या प्लेलिस्टमधल्या गंमतींचीही वाट पहातेय.