१६-१७ वर्षं नक्की झाली असतील ह्या फोटोला.
रुपाली सोहोनी-कामत Rupali Sohoni , आळसावलेली रविवार दुपार आहे आणि उगीचच जुने फोटो चाळत बसलेय गं. पहिल्यांदा घरी आली होतीस तेव्हा क्षिप्रानं Kshipra Tumne काढलेला हा. तिघींचा एकत्र नाहीच घेतलाय का? मला अजिबात आठवत नाहीये. एवढ्या वर्षांत पुलाखालून केवढं पाणी वाहून गेलं, चढ उतार आले, स्थलांतरं स्थित्यंतरं झाली. पण मैत्रीला कसलाही ओरखडा नाही
आपल्याबरोबर प्रवास केलेल्या मित्रमंडळींबरोबरचा संवाद आनंदाचा असतो. भले महिनोन्महिने बोलू नका एकमेकांशी, पण केव्हाही बोललं तरी मागील पानावरून पुढे सुरू इतकी सहजता असते. अंबर कर्वे Dinesh Shinde Sachin Kisan Pansare बरोबर ना?
No comments:
Post a Comment