आजपासून कोल्हापूर आकाशवाणीवरून दर शुक्रवारी सकाळी साडेनऊला प्र. ना. संतांच्या लंपन कथांवर आधारित 'शारदा संगीत' मालिकेचं प्रसारण सुरू झालं आहे
लंपू आणि त्याचं जग ऐकायला विसरू नका.
आवर्जून ऐकावेच अशा कार्यक्रमांची योग्य प्रकारे जाहिरात व्हायला हवी. एआयआर ऍप डाऊनलोड करून घेतल्यास कोल्हापूरबाहेरच्या सर्वांनाही ऐकता येईल. खाली लिंक दिली आहे.
आज पहिला भाग झाला. ही एक उत्कृष्ट मालिका आहे. पुणे केंद्रावरून ह्यापूर्वी अनेकदा प्रसारीत झालेली आहे.
सहसा नभोनाट्य हा सुखद अनुभव असतोच, लंपन सिरीजही त्या अनुभवाला अपवाद नाही. अतिशय साधलेला प्रयोग आहे. कथांचं उत्तम रुपांतरण, चपखल पात्रयोजना आणि उत्कृष्ट संगीत (श्रीरंग उमराणी) आहे. मदन देवधर (लंपू), अनुजा बोरकर (सुमीचा ठसका तंतोतंत पकडलाय तिनं), विजय देव (आजोबा), राजेश मोरे (बाबूराव), क्वचित डोकावणारे बाबा (सचिन कुंडलकर) आई (माधुरी पुरंदरे) आणि आजी (ज्योती सुभाष). सचिन कुंडलकरांचं दिग्दर्शन खरंच साजेसं आणि सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी आहेत.
No comments:
Post a Comment